Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानने एक्स पत्नींसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:06 IST

Aamir Khan : आमिर खानने दोन लग्न केली आहेत. त्याची दोन्ही लग्न १५ वर्षे टिकली. त्यानंतर आता तो गौरी स्प्रैटला डेट करतो आहे. नुकतेच एका मुलाखतीत त्याने त्याच्या एक्स पत्नींबद्दल बोलला.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान त्याच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने दोन लग्न केली आहेत. त्याची दोन्ही लग्न १५ वर्षे टिकली. त्या दोघींसोबत विभक्त झाल्यानंतर आता तो गौरी स्प्रैटला डेट करतो आहे. नुकतेच एका मुलाखतीत त्याने त्याच्या एक्स पत्नींसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला.

आजतकशी बोलताना आमिर खानने त्याच्या मनात एक्स पत्नी रीना आणि किरण यांच्याबद्दल सांगितले. तो म्हणाला, "मी खूप भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात मी इतक्या चांगल्या लोकांना भेटलो आणि आमचं नातं अनेक वर्षांपर्यंत टिकलं. प्रेम ही खूप शक्तिशाली भावना आहे. यामुळे खूप उपचार होतो. प्रेम आणि तिरस्कार या दोन भावना एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तिरस्कार खूप थकवून टाकतो. प्रेम खूप समृद्ध करतं. ते तुम्हाला आशा देतं. ते तुम्हाला काळजी देतं."

आमिर खानचं वैयक्तिक आयुष्यआमिर खानने दोन लग्न केली आहेत. त्याचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले. या लग्नातून त्यांना जुनेद आणि आयरा ही दोन मुले आहेत. रीना दत्तासोबत विभक्त झाल्यानंतर आमिरने किरण रावशी दुसरे लग्न केले. या लग्नातून त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. किरण रावसोबतही तो वेगळा झाला. अभिनेत्याने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅटला सर्वांसमोर आणले होते. तेव्हापासून तो गौरीसोबतच जास्त दिसतो. आमिर आणि गौरी यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. अलीकडेच या दोघांना एअरपोर्टवर पाहिले गेले. ते एकमेकांचा हात धरून चालताना दिसले.

वर्कफ्रंटबद्दल आमिर खान शेवटचा 'सितारे जमीन पर' या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट २०२५ मध्येच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला खूप पसंती मिळाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरएस प्रसन्ना यांनी केले होते. हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या आमिरच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा सीक्वल आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Aamir Khan opens up about relationship with ex-wives.

Web Summary : Aamir Khan discussed his relationships with ex-wives Reena and Kiran, emphasizing love's healing power. He values their lasting connections. Aamir is currently dating Gauri Spratt. He was last seen in 'Sitare Zameen Par'.
टॅग्स :आमिर खानकिरण रावजुनैद खानइरा खान