बॉलिवूड अभिनेता जुनैद खानने 'लवयापा' या चित्रपटाच्या अपयशानंतर 'एक दिन' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते. मात्र, हा चित्रपट देखील प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात अपयशी ठरला असून बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. नुकत्याच एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जुनैदने चित्रपटाच्या अपयशावर भाष्य केले आणि त्याचे वडील आमिर खान किती दु:खी आहेत, हे देखील सांगितले.
'एक दिन'चित्रपटाच्या खराब कामगिरीबद्दल बोलताना जुनैद अत्यंत शांत दिसला. तो म्हणाला, "हो, चित्रपटाने चांगली कामगिरी केली नाही. आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण चित्रपट प्रेक्षकांना भावला नाही. ही कथा मला खूप आवडली होती आणि मी या चित्रपटात काम करण्याचा आनंद घेतला. काही लोकांना चित्रपट आवडला, पण बहुतेकांना तो आवडला नाही असं दिसतंय. आयुष्यात कधीकधी अशा गोष्टी घडतात."
आमिर खान अजूनही दुखी
जेव्हा जुनैदला विचारण्यात आले की, या चित्रपटाचे निर्माता आमिर खानची प्रतिक्रिया काय होती? त्यावर तो म्हणाला, "आमिर खान या अपयशामुळे भावनिकरीत्या दुखावले गेले आहेत. इतकी वर्षे या क्षेत्रात असूनही आणि अनेक चढ-उतार पाहूनही, चित्रपटाचे फ्लॉप होणे त्यांना अजूनही अस्वस्थ करते. ते चित्रपटाच्या अपयशाकडे गांभीर्याने पाहतात, विशेषतः जेव्हा त्यांना ती कलाकृती मनापासून आवडलेली असते. तरीही, ते स्वतःला कामात बिझी ठेवतात आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात."
'एक दिन' चित्रपटाबद्दल
सुनील पांडे दिग्दर्शित 'एक दिन' या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट २०१६ च्या 'वन डे' या थाय चित्रपटाचा रिमेक आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर कमाईत सातत्याने घट होत गेली. रिपोर्ट्सनुसार, ११ दिवसांत या चित्रपटाने जगभरात केवळ ५.४४ कोटी रुपये आणि भारतात ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Web Summary : Junaid Khan's 'Ek Din' flopped, disappointing him and his father, Aamir Khan. Despite the setback, Aamir remains supportive, focusing on future projects.
Web Summary : जुनैद खान की 'एक दिन' फ्लॉप हो गई, जिससे उन्हें और उनके पिता आमिर खान को निराशा हुई। असफलता के बावजूद, आमिर भविष्य की परियोजनाओं पर ध्यान केंद्रित कर रहे हैं।