Join us

Aamir Khan Invited Kapil Sharma : आमिर खानच्या घरी रंगली महफिल! सुंदर गाणं गात कपिल शर्माने वाढवली शोभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 16:18 IST

गंमत म्हणजे आमिर खान आजपर्यंत कपिलच्या शोवर गेलेला नाही.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) काही दिवसांपूर्वी त्याच्या मित्रपरिवाराला घरी बोलावले होते. यामध्ये कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) देखील होता. आता कपिल आहे म्हणल्यावर मजा मस्ती तर होणारच. पण कपिलचं आणखी एक टॅलेंट म्हणजे त्याचं गाणं. कपिल किती उत्तम गातो याची झलक तो शोमध्ये दाखवतच असतो. पण आता कपिलने आमिरच्या घरातच महफिल जमवल्याचं पाहायला मिळालं.

हातात ड्रिंक्सचा ग्लास, बाजुला गिटारिस्ट आणि समोर सर्व मित्रपरिवार अशा वातावरणात कपिलने आमिरच्या घरी महफिल जमवली. गुलाम अली यांचं एक गाणं सादर करत त्याने संध्याकाळ सुंदर बनवली. त्याचं गाणं आमिर खानसह बाकी मित्र एंजॉय करत होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

गंमत म्हणजे आमिर खान आजपर्यंत कपिलच्या शोवर गेलेला नाही. त्यामुळे या व्हिडिओतून असं वाटतं की आमिरने पूर्ण शोच स्वत:च्या घरी ठेवला आहे. आमिरने मुंबईतल्या त्याच्या घरी 'कॅरी ऑन जट्टा 3' आणि 'कपिल शर्मा शो' च्या टीमला आमंत्रित केलं होतं.यामध्ये मिर खान, कपिल शर्मा, सोनम बाजवा, कविता कौशिक आणि कीकू शारदा सोबत अनेक लोक दिसत आहेत. अर्चना पूरण सिंहने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

टॅग्स :आमिर खानकपिल शर्मा