Join us

Birthday च्या दिवशी आमिर खानने फॅन्सना दिले 'हे' खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 13:21 IST

आमिर खानचे हा बॉलिवूडमध्ये एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण ...

आमिर खानचे हा बॉलिवूडमध्ये एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज मिस्टर परफेक्शनिस्ट आपला वाढदिवस साजरा करतो आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एक वेगळा ट्रेंड सुरु झाला आहे. प्रत्येक स्टार आपल्या वाढदिवसाच्या दिवशी फॅन्सना एका खास गिफ्ट देतात.  यावेळी आमिर खान सुद्धा आपल्या फॅन्सना एक खास वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट दिले आहे. ते गिफ्ट असे आहे की आज आमिर खान आपल्या फॅन्ससाठी इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. त्यामुळे फॅन्सना यापुढे त्याचे सगळे अपडेट्स मिळत राहणार आहेत. आमिरच्या पहिल्या पोस्टबाबत बोलायचे झाले तर तो आपल्या आईचे स्केच शेअर केले आहे.  जे त्याला त्याच्या कुटुंबातील एक व्यक्तीने गिफ्ट म्हणून दिले होते. आमिर आपल्या आईच्या खूप जवळ आहे. आमिरचे म्हणणे आहे आज जे काही तिने मिळवले आहे ते केवळ आईमुळेच. मिळालेल्या माहितीनुसार आमिर खाने इन्स्टाग्रामवर डेब्यू करण्यास खूप उत्सुक होता. आमिर खानचे इन्स्टाग्रामवर आजपर्यंत अनेक फेक अकाऊंट्स बनवले आहेत. 2014 मध्ये आमिरने स्वत: सांगितले होते की त्यांचे इन्स्टाग्रामवर कोणतेच अकाऊंट नाही आहे. ALSO READ :  Birthday Special : -​अन् किरण रावसाठी आमिर खानने सोडले पहिले प्रेम!आमिरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी आमिरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता.  आमिरने या व्हिडिओ  त्याच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले आहे. ‘मी १० वर्षांचा असताना एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. खूप कमी लोकांना हे माहित आहे. मी टेनिस क्लासला जायचो. त्यावेळी टेनिस कोचिंगमध्ये खूप मोठा ग्रूप होता. आम्ही सगळे १० वर्षांच्या वयोगटातील ४०-५० मुलं- मुली होतो. याच ग्रूपमध्ये एक मुलगी होती. तिला पाहताच मी भान हरपलो होतो. तिला पहिल्यांदा पाहिले आणि मी तिच्या प्रेमात वेडा झालो. म्हणजे, दिवसरात्र मी केवळ तिच्या अन् तिच्याबद्दल विचार करायचो. ‘पहला नशा...’ या गाण्यातील ‘उडता ही फिरूं इन हवाओं में कही...’ या ओळीसारखी माझी अवस्था होती. ती १० वर्षांची होती आणि कमालीची सुंदर होती. तिला इम्प्रेस करण्यासाठी मी नाही नाही ते उपद्व्याप केलेत. पण अखेरपर्यंत तिला सांगण्याची हिंमत मात्र झाली नाही. क्लासमध्ये सर्वात आधी पोहोचणारा आणि सर्वात उशीरा निघणारा मी होतो. तिला इम्प्रेस करण्याच्या नादात केवळ आणि केवळ माझा गेम चांगला झाला. बाकी माझ्या मनातले मी तिला कधीच सांगू शकलो नाही. पुढे चार वर्षांत ती तिच्या कुटुंबासोबत निघून गेली. ते ‘सायलेंट लव्ह’ होते. जे कायम अधूरे राहिले. इंटरेस्टिंग म्हणजे, मला दोन-तीनदा असे प्रेम झाले. पण प्रेमात मी फार लकी नव्हतो. पण आता माझ्यासारखा नशीबवान कुणीच नाही. ज्यांना आयुष्यात प्रेम मिळाले नाही, अशा लोकांबद्दल मी कमालीचा भावूक होतो. अशा सगळ्यांसाठी माझ्या मनात एक खास जागा आहे, असे आमिरने या व्हिडिओत सांगितले.