Join us

कल्किला 'या' चित्रपटात आमिर खानसोबत करायचे आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:47 IST

हो तुम्ही अगदी बरोबर वाचलात कल्किला आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. कल्किने आमिरपर्यंत हा संदेश मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा ...

हो तुम्ही अगदी बरोबर वाचलात कल्किला आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. कल्किने आमिरपर्यंत हा संदेश मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या कल्कि तिचा आगामी चित्रपट मंत्रा च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या प्रमोशनदरम्यान मीडियाशी बोलताना गुरुदत्त यांच्या  प्यासा या आर्ट चित्रपटात काम करण्याचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले आहे. कल्किला खूप साऱ्या आर्ट सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा आहे मात्र हा प्यासा हा त्यातला तिचा सगळ्यात जवळचा चित्रपट आहे. प्यासा या चित्रपटाचा सीक्वल बनला पाहिजे कारण प्यासा हू अत्यंत सुंदर प्रेमकथा होती. या चित्रपटातील गाण्यांही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. यावेळी कल्किला सांगण्यात की आमिरलाही प्यासाचा सीक्वल बनण्याची इच्छा आहे. यावर कल्किने लगेच उत्तर दिले जर तुम्हाला आमिर खान भेटाला तर त्याला नक्की सांगा की मला या चित्रपटाचा हिस्सा बनण्य़ाची फार इच्चा आहे.  मिस्टर परफेक्निस्ट आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीची असते. आमिरच्या प्रत्येक चित्रपटावर तो स्वत:ला झोकून देऊन काम करतो.