Join us

बिग बींसोबत काम करण्यापूर्वी आमीर खानने शाहरूख खानला विचारला होता हा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 21:00 IST

आमीर खान व अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देठग्स ऑफ हिंदोस्तान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आमीर खान व अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून पहिल्यांदाच अमिताभ बच्चन व आमीर खान एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात आमीर फिरंगी मल्लाहची भूमिका साकारतो आहे. या भूमिकेसाठी आमीर खान खूपच उत्सुक आहे. 

एका मुलाखतीदरम्यान, आमीरने सिनेमाविषयी काही किस्से शेअर केलेत. तो म्हणाला, मला नेहमीच माझ्या आवडीच्या कलाकारांसोबत काम करण्याची इच्छा होती. यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी. मला खूप दुःख आहे की, मी श्रीदेवी यांच्यासोबत काम करु शकलो नाही. मला कधी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. यादरम्यान, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काही खास क्षण घालविले आहे. 'ठग्स ऑफ हिन्दोस्थान'च्या चित्रीकरणाआधी मी शाहरुखला भेटण्यास गेलो होतो. मी शाहरुखला विचारले की, काय मी अमिताभ यांच्या समोर सिगरेट पिऊ शकतो ? शाहरुखने उत्तर दिले, होय का नाही. ते खूप कुल व्यक्ती आहेत. तसेच आमीर पुढे म्हणाला, अमिताभ बच्चन यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळते. ज्या पद्धतीने ते आजही त्यांच्या लाईन्स आठवून सतत त्याचा सराव करतात यामुळे त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. आमीर खान व अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तानआमिर खानशाहरुख खान