अभिनेता आमिर खान(Aamir Khan)ने त्याच्या ६० व्या वाढदिवशी गौरी स्प्रॅटसोबतच्या नात्याला दुजोरा दिला होता. तेव्हापासून ते सतत चर्चेत आहेत. आमिर घटस्फोटित असून तीन मुलांचा वडील आहे. त्याने दोनदा लग्न केले पण त्याची दोन्ही लग्नं मोडली. आता दोन-दोन लग्नं मोडल्यानंतर आमिर खान गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तिसऱ्यांदा प्रेम मिळाल्यावर नुकताच त्याने आपला आनंद व्यक्त केला आणि स्वतःला नशीबवान म्हटले.
हिंदुस्तान लीडरशिप समिट २०२५ मध्ये आमिर खान म्हणाला की, त्याने कधीच विचार केला नव्हता की तो पुन्हा रिलेशनशीपमध्ये येतील. आमिर खानच्या म्हणण्यानुसार, ''ती (गौरी) खूप शांती आणि स्थिरता घेऊन आली आहे. ती खरोखरच एक अप्रतिम व्यक्ती आहे. तिला भेटणे हे माझे भाग्य आहे. माझी लग्नं टिकली नाहीत, पण रीना, किरण आणि गौरी माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी खूप आनंदी आहे. एक व्यक्ती म्हणून त्यांनी माझ्यामध्ये खूप मोठे योगदान दिले आहे आणि हे मी अनेक प्रकारे मान्य करतो.''
अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आमिर-गौरीतो पुढे म्हणाला की, या तिन्ही महिलांनी त्याचे आयुष्य खूप चांगले बनवले आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि ते त्याचा खूप आदर करतात.
आमिर खानचे खासगी आयुष्यगौरी मूळची बंगळुरूची आहे. तिला एक ६ वर्षांची मुलगीही आहे. आमिर आणि गौरी एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. मात्र, आता ते रिलेशनशीपमध्ये आहेत. आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत १९८६ ते २००२ पर्यंत झाले होते आणि त्यांना जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुले आहेत. २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रीनापासून वेगळे झाल्यानंतर आमिर खानने किरण रावसोबत लग्न केले. त्यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे. या लग्नात सगळे काही ठीक होते पण अचानक १६ वर्षांनंतर हे लग्न मोडले.
Web Summary : Aamir Khan confirmed his relationship with Gauri Spratt at 60, expressing happiness and considering himself fortunate. Despite two failed marriages, he values the women in his life, acknowledging their significant positive impact.
Web Summary : आमिर खान ने 60 साल की उम्र में गौरी स्प्रैट के साथ रिश्ते की पुष्टि की, खुशी जताई और खुद को भाग्यशाली बताया। दो असफल शादियों के बावजूद, वह अपने जीवन की महिलाओं को महत्व देते हैं, उनके सकारात्मक प्रभाव को स्वीकार करते हैं।