Aamir Khan : आमिर खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या कामामुळे त्याची अनेकदा चर्चा होताना दिसते. तसेच त्याला बॉलिवूडमधील 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असेही म्हटले जाते. आमिर खान सध्या त्याच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि खिलाडूवृत्तीमुळे चर्चेत आला आहे. शनिवारी मुंबईत पार पडलेल्या वर्ल्ड पिकलबॉल लीग (WPBL) २०२६ मध्ये एक धक्कादायक घटना घडली. सामन्यादरम्यान आमिर खान कोर्टवर जोरात घसरून पडला.
मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डन येथे पार पडलेल्या WPBL च्या दुसऱ्या हंगामात आमिर खान चाहत्यांसोबत सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, समोरून आलेला एक शॉट परतवण्यासाठी आमिर वेगाने पुढे सरकला. पण त्याच वेळी त्याचा तोल गेला, पाय अडखळला आणि तो थेट जमिनीवर पडला. पडल्यानंतर लगेचच एका सहकारी खेळाडूने आमिरला हात देऊन उठवले. वयाची साठी गाठलेला आमिर खान अत्यंत शांतपणे उठला, चेहऱ्यावर हास्य आणले आणि कोणतीही विश्रांती न घेता पुन्हा खेळायला सुरुवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आमिर खान अलीकडेच त्याने निर्मित केलेल्या 'हॅपी पटेल: डेंजरस डिटेक्टिव्ह' या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसला होता. मात्र, वीर दासच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले आणि १६ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केवळ ७.३५ कोटींची कमाई केली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाने २६७.५२ कोटींची दमदार कमाई केली होती.
Web Summary : Aamir Khan, known for his dedication, recently fell during a pickleball match at the World Pickleball League in Mumbai. Despite the fall, the 60-year-old actor quickly recovered and continued playing, impressing fans with his resilience and sportsmanship. He was recently seen in 'Happy Patel: Dangerous Detective'.
Web Summary : मुंबई में वर्ल्ड पिकलबॉल लीग में खेलते समय आमिर खान गिर गए। गिरने के बावजूद, 60 वर्षीय अभिनेता तुरंत उठे और खेलना जारी रखा, जिससे प्रशंसक उनकी खेल भावना से प्रभावित हुए। आमिर खान हाल ही में 'हैप्पी पटेल: डेंजरस डिटेक्टिव' में दिखे थे।