Join us

CoronaVirus: प्रसिद्धीपासून दूर राहत आमीर खानने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिला मदतनिधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 19:52 IST

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमीर खानने पीएम केअर फंड व मुख्यमंत्री रिलीफ फंडात निधी दिल्याचे समजते आहे. 

कोरोना व्हायरसमुळे देशावर आलेल्या संकटामुळे बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रेटी पुढे आले आहेत. अक्षय कुमार, शाहरूख खान, कार्तिक आर्यन, रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी पीएम केअर फंड व मुख्यमंत्री रिलीफ फंडात डोनेशन दिले आहे. तर सलमान खान 25000 दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कामगारांची मदत केली आहे. यादरम्यान आमीर खानने मदत केल्याची कोणतीच माहिती समोर आली नव्हती. मात्र आता समजतंय की आमीर खानने पीएम केअर फंड व मुख्यमंत्री रिलीफ फंडात निधी दिला आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीर खानने खुलासा न करता पीएम केअर फंड व मुख्यमंत्री रिलीफ फंडात निधी दिला आहे. याशिवाय आमीर खानने काही फिल्म वर्कर असोसिएशन आणि सामाजिक संस्थांना मदतनिधी दिला आहे. याशिवाय लॉकडाउनमध्ये आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढाशी निगडीत दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कामगारांनाही त्याने मदत केली आहे.

आमीर खानने आतापर्यंत केलेल्या मदतीचा खुलासा केलेला नाही. भारतासोबत जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडला आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 4421 झाली आहे. 24 तासात कोरोनाचे 354 प्रकरणं समोर आली आहेत.

टॅग्स :आमिर खानकोरोना वायरस बातम्या