Join us

आमिर खानची मुलगी इरा खानला आहे 25 इंटर्न्सची गरज, मिळणार एवढी सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 16:11 IST

इराने आज २२ मार्चपासून काही काम सुरू केले आहे.

आमिर खानची मुलगी इरा खानने  जरी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला नसला तरी ती कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.  इरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि यावेळी तिने महत्वाची बातमी शेअर केली आहे. इराने आज २२ मार्चपासून काही काम सुरू केले आहे. जॉब व्हॅकेसी आणि सॅलरी डिटेल शेअर केली आहे. 

मानसिक आरोग्य ठीक नसणाऱ्यांना मदत करण्यासाठी इराने हे पाऊल उचलले आहे. इराने सांगितले आहे की तिला किती लोकांच्या टीमची आवश्यकता आहे. लोक  या नोकरीसाठी कुठे अर्ज करू शकतात. या लोकांना दरमहा किती पैसे पगार म्हणून हेही इराने सांगितले आहे. 

 

इराने  इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट केले की तिला २५  इंटर्न्सची आवश्यकता आहे.  हे लोक असे असले पाहिजेत जे निरनिराळ्या भाषा बोलु शकतात. तिने  म्हटले आहे की ८ तासांची शिफ्ट आज २२ मार्चपासून सुरू होणार आहे. ही इंटर्नशिप एका महिन्याची असेल आणि प्रत्येक उमेदवाराला पाच हजार रुपये दिले जातील.  इच्छुकांना त्यांचा सीव्ही पाठविण्यास सांगून तिने यासाठी एक ईमेल आयडीदेखील शेअर केला आहे.

 या व्यतिरिक्त, इरा खानने त्या लोकांना पुढे येण्यासाठी लिहिले आहे, जे स्वयंसेवक बनून यास मदत करू शकतात. इराने अशा लोकांना त्यांचा सीव्ही पाठविण्यासाठी ईमेल आयडी दिला आहे. 

टॅग्स :इरा खानआमिर खान