Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानने दिली आनंदाची बातमी, 'थ्री इडियट्स'चा सीक्वल येणार; म्हणाला "राजकुमार हिराणी हे चित्रपटावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:31 IST

'थ्री इडियट्स'च्या सीक्वलवर दिग्दर्शक राजकुमार हिराणी काम करत असल्याचंही बोललं जात आहे. आता या चर्चांवर आमिर खानने मौन सोडलं आहे.

Aamir Khan Confirms 3 Idiots Sequel : बॉलिवूडमधील एव्हरग्रीन सिनेमा 'थ्री इडियट्स'च्या सीक्वलची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. आता या चर्चांवर थेट आमिर खानने मौन सोडलं आहे.  'थ्री इडियट्स'चा सिक्वेल येणार असून त्यावर अधिकृतपणे काम सुरू असल्याची माहिती आमिर खानने दिली आहे. 

आमिर खानने एका मुलाखतीत सांगितले की, 'थ्री इडियट्स'च्या सीक्वलवर दिग्दर्शक राजकुमार हिराणी हे काम करत आहेत. मी कथा ऐकली आहे. अजून स्क्रिप्टवर थोडं काम बाकी आहे, पण स्टोरी खूपच छान आहे. पहिल्या भागासारखाच ह्युमर आणि वेगळी कथा यात आहे. मात्र ही कथा १० वर्षांनंतरची आहे", असं त्यानं सांगितलं. 

आमिर खानने आपल्या लोकप्रिय 'फुन्सुख वांगडू' या भूमिकेत पुन्हा दिसण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "ही माझ्या पुढील प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. अभिजात आणि राजू यांनी खूप सुंदर कथा लिहिली आहे", असंही त्यानं नमूद केलं.

पुन्हा एकत्र येणार स्टारकास्ट

२००९ साली प्रदर्शित झालेल्या 'थ्री इडियट्स'मधून आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी हे त्रिकुट प्रेक्षकांना मिळालं होतं. रिपोर्ट्सनुसार, आता सीक्वलमध्येही मूळ स्टारकास्ट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. यात आर.माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर यांचाही समावेश असू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Aamir Khan Confirms '3 Idiots' Sequel; Raju Hirani Working on Film

Web Summary : Aamir Khan confirmed a '3 Idiots' sequel is in the works, directed by Rajkumar Hirani. The script is nearly complete, with the original cast likely returning for this next chapter set ten years later. Aamir expressed his desire to reprise his role as Phunsukh Wangdu.
टॅग्स :आमिर खानराजकुमार हिरानी