बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान याने १४ मार्च रोजी आपला ६१ वा वाढदिवस अत्यंत साध्या पण कौटुंबिक वातावरणात साजरा केला. या सेलिब्रेशनचा एक खास व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यामध्ये आमिर खान हा त्याची गर्लफ्रेंड, दोन्ही EX पत्नी, मुले आणि खास मित्रांसोबत केक कापताना दिसत आहे.
आमिर खानच्या या वाढदिवसाच्या पार्टीत त्याचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. त्याची पहिली पत्नी रीना दत्ता, मुले जुनैद आणि इरा खान, दुसरी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद हे सर्वजण या आनंदात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, आमिरची प्रेयसी गौरी स्प्राट देखील या सेलिब्रेशनमध्ये उपस्थित होती. आमिरने केक कापल्यानंतर पहिला घास मुलगा आझादला, त्यानंतर मुलगी इराला आणि नंतर गौरीला भरवला.
इरफान पठाणने शेअर केला व्हिडीओमाजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने आपल्या पत्नीसह या पार्टीला हजेरी लावली होती. त्यानेच या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना इरफानने आमिरला शुभेच्छा दिल्या आणि त्याची मुलगी इरा खान हिच्या 'अगात्सु फाऊंडेशन' (Agatsu Foundation) मार्फत सुरू असलेल्या मानसिक आरोग्याबाबतच्या कार्याचे कौतुक केले. "इराला मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवताना पाहून खूप आनंद झाला" असे इरफानने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षावसोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी आमिरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी आमिरच्या साधेपणाचे आणि आपल्या कुटुंबाला (माजी पत्नी आणि मुलांसह) एकत्र ठेवण्याच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. ६१ व्या वर्षीही आमिरचा उत्साह पाहून त्याचे चाहते थक्क झाले आहेत.
Web Summary : Aamir Khan celebrated his 61st birthday with family, including ex-wives Reena Dutta, Kiran Rao, girlfriend Gauri Sprat, and children. The viral video shows Aamir cutting the cake and offering the first piece to his son, daughter, and girlfriend.
Web Summary : आमिर खान ने पूर्व पत्नी रीना दत्ता, किरण राव, गर्लफ्रेंड गौरी स्प्राट और बच्चों सहित परिवार के साथ अपना 61वां जन्मदिन मनाया। वायरल वीडियो में आमिर केक काटते हुए और पहला टुकड़ा अपने बेटे, बेटी और गर्लफ्रेंड को देते हुए दिखाई दे रहे हैं।