Join us

आमिर खान झाला अॅवॉर्ड सोहळ्यात स्पॉट..हा घ्या पुरावा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 13:32 IST

आमिर खानची बॉलिवूडमध्ये मीस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख आहे. कोणत्याही अॅवॉर्ड सोहळ्यात आमिर खान कधीच हजेरी लावत नाही. मात्र हाच ...

आमिर खानची बॉलिवूडमध्ये मीस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख आहे. कोणत्याही अॅवॉर्ड सोहळ्यात आमिर खान कधीच हजेरी लावत नाही. मात्र हाच आमिर खानला एका अॅवॉर्ड सोहळ्यात स्पॉट झालाय. हे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसले का ?, हो पण आम्ही सांगतोय ते अगदी खरं आहे आमिर खानने ‘जीक्यू मॅन ऑफ द इयर’ या अॅवॉर्ड सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी रणवीर सिंगने आमिरसोबत सेल्फि काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. आमिर खान आतपर्यंत प्रत्येक अॅवॉर्ड सोहळ्यापासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्यामुळे पहिल्यांदा एखाद्या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी आमिरने उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. यावेळी आमिर खान त्याचा आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या लूकमध्ये दिसला. सध्या आमिर ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यशराज बॅनर खाली तयार होणाऱ्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. चित्रपटात बिग बी आमिर खानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आमिर आणि अमिताभ यांचे फॅन्स हा चित्रपट रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहात असतील. हा चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कॅटरिनाची भूमिका आधी कंगना राणौतला ऑफर करण्यात आली होती. मात्र तिने ती भूमिका करण्यास नकार दिल्याने यात कॅटरिना कैफला घेण्यात आले. तर फातिमा साकारत असलेल्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूर ही रेसमध्ये होती. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विजय कृष्णा आर्चाय करत आहेत.  ALSO READ : यामुळेच आमिर खानने रेखाबरोबर एकाही चित्रपटात केले नाही काम!   ठग्स ऑफ हिंदुस्ताननंतर आमिर खान सैल्यूट चित्रपटात दिसणार असल्याचे कळते आहे. यात तो अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारतो आहे. याचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. यात आमिरच्या पत्नीची भूमिका प्रियांका चोप्रा साकारणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे प्रियांका चोप्राने हा चित्रपटात साईन केला असले तर पहिल्यांदाच आमिर खान आणि प्रियांकाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.