बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमिर असा कलाकार आहे जो फार कमी लोकांवर विश्वास ठेवतो आणि फार कमी व्यक्तींना आपल्या जीवनात जवळीक साधण्याची संधी देतो. अशा व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे आमोस. फार कमी लोकांना आमोस यांच्या आडनावाबद्दल माहित आहे. ते सिनेइंडस्ट्रीत याच नावाने ओळखले जात होते. आमोस यांना आमीर खानची सावली म्हटले जात होते. आमोस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, अमोस हे गेल्या २५ वर्षांपासून आमिरसोबत काम करत होते. त्यांचे हृदयविकाराचा झटक्यामुळे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. अमोस यांच्यावर होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अमोस यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले, सुना असा परिवार आहे.
आमिर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, त्याची 'सावली' संबोधल्या जाणाऱ्या व्यक्तीचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 10:26 IST