Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' व्यक्तीवर बायोपिक घेऊन येतोय आमिर खान; २२ वर्षांनी लहान मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:56 IST

आमिर खान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे.

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. 'सितारे जमीन पर' नंतर आमिरच्या हाती एक मोठा चित्रपट लागला असून, तो'शार्क टँक इंडिया'चा परीक्षक आणि उद्योगपती अशनीर ग्रोव्हर याचा बायोपिक असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात आमिरच्या विरुद्ध बॉलिवूडची 'स्त्री' अर्थात मराठमोळी श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची दाट शक्यता आहे.

मिड-डेच्या वृत्तानुसार, ३९ वर्षीय श्रद्धा कपूर या बायोपिकमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ६१ वर्षीय आमिर खान आणि त्याच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेली श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, आमिरने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली असून तो कथेने प्रचंड प्रभावित झाला आहे. त्यामुळे त्याने या प्रोजेक्टसाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

सध्या हा चित्रपट प्री-प्रॉडक्शन स्टेजवर आहे. चर्चा अशीही आहे की, श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करू शकतो. अद्याप या चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू आहेत. आमिर खानचे गेल्या काही वर्षांतील 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' आणि 'लाल सिंग चड्ढा' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. 'सितारे जमीन पर'ला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी आमिरला एका मोठ्या ब्लॉकबस्टरची प्रतीक्षा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Aamir Khan to star in biopic with Shraddha Kapoor.

Web Summary : Aamir Khan may star in Ashneer Grover's biopic alongside Shraddha Kapoor. The film is in pre-production, and Rahul Modi may direct. After recent underperforming films, Aamir seeks a blockbuster hit.
टॅग्स :आमिर खानश्रद्धा कपूर