Join us
Daily Top 2Weekly Top 5

या प्रसिद्ध संगीतकारच्या आयुष्यावर येणार पुस्तक, आमिर खानने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 10:37 IST

अनेक महिन्यांपासून या संगीतकाराची प्रकृती ठीक नाहीय आणि त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेदेखील नाहीत.

बॉलिवूडमध्ये अभिनेता आमिर खानने ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांना मदत करण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी वनराज भाटिया त्यांच्या शारिरीक आणि आर्थिक परिस्थितीमुळे प्रकाशझोतात आले होते. अनेक महिन्यांपासून वनराज भाटिया यांची  प्रकृती ठीक नाहीय आणि त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेदेखील नाहीत. आजतकच्या रिपोर्टनुसार वनराज भाटिया यांनी एक मुलाखती दरम्यान सांगितले की, त्यांच्या खात्यात एक रुपयादेखील शिल्लक राहिलेला नाही. आमिरने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे.     

आमिरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहीले आहे की, ''मला हे सांगताना खूप आनंद होतो आहे की संगीतकार वनराज भाटिया यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले जाणार. खालिद मोहम्मद हे पुस्तक लिहिणार. माझा मित्र दलीप ताहिल याने घेतलेल्या पुढाकाराने लिहिले जातेय.'' वनराज भाटिया गुडघ्याच्या आजाराने ग्रस्त आहेत. तसेच त्यांना ऐकायला देखील कमी येतेय. हळूहळू त्यांची स्मृतीदेखील जातेय.

 आमिर खानच्या आधी वनराज भाटिया यांच्या मदतीसाठी कबीर बेदीने यांनी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते.  दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनीदेखील आवाहन केले आहे. वनराज भाटिया यांनी अमिताभ बच्चन यांच्या अजूबा और तमस, अंकुर, मंथन, मंडी, जुनून आणि कलयुग सिनेमांना संगीत दिलं आहे.  वनराज भाटिया राष्ट्रीय पुरस्कारांना, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि  पद्म श्री पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे.      

टॅग्स :आमिर खान