बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या स्टार किड्सची चलती आहे. गेल्या वर्षभरात अनेक स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. आता आणखी एक स्टारकिड बॉलिवूडच्या वाटेवर आहे आणि या स्टारकिडचे नाव आहे, जुनैद खान. आता हा जुनैद खान कोण, हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. होय, तोच तो बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा मुलगा.
काही वर्षांपूर्वी जुनैदच्या बॉलिवूड डेब्यूविषयी बोलताना आमिर कचरायचा. पण आता मात्र जुनैदने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि पापा आमिरने त्यासाठी कंबर कसलीय. अलीकडे एका मुलाखतीत आमिर जुनैदच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलला. तो म्हणाला की, माझा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. मात्र अद्यापही आम्हाला एका उत्तम स्क्रिप्टचा शोध आहे. मी जुनैदचे काम पाहिले आहे आणि त्याच्या कामावर मी जाम खूश आहे. एक चांगली स्क्रिप्ट मिळताच, त्याच्या चित्रपटावर काम सुरु होईल. अर्थात यासाठी सर्वात आधी त्याला स्क्रिन टेस्ट द्यावी लागेल. ही टेस्ट पास केली तरच तो चित्रपटात असेल. अन्यथा नसेल. मी आधीच त्याला हे बजावले आहे.