Join us

​महावीर सिंग फोगटच्या गावकऱ्यांना आमिरने दिली भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 20:19 IST

आमिर खानचा बहुप्रतिक्षित दंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला चांगले यश मिळाल्याच्या चर्चा आहेत. आमिरने ...

आमिर खानचा बहुप्रतिक्षित दंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला चांगले यश मिळाल्याच्या चर्चा आहेत. आमिरने या चित्रपटात कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची कथा मांडली आहे. महावीर सिंग यांच्या गावातील लोकांसाठी अनोखी भेट दिली आहे.महावीर सिंग फोगट व गीता फोगट यांच्या बलाली या गावातील लोकांना दंगल हा चित्रपट पाहता यावा यासाठी आमिर खानने २५० आसनक्षमता असलेले हरियाणा राज्यातील भिवानी या शहरातील सन सिटी नामक एक थिएटर बुक केले आहे. येथे सायंकाळी ५ वाजता या दंगलच्या स्पेशल शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोला महावीर सिंग फोगट व गीता फोगट देखील उपस्थित राहणार आहेत. आपल्या गावातील लोकांशी हे दोघेही भेटणार असून, त्यांच्याशी या चित्रपटाविषयी चर्चा करणार आहेत. मागील दोन दिवसांपासून मुंबईत दंगलचे स्पेशल स्क्रिनिंग शो आयोजित करण्यात येत असून, येथे महावीर सिंग फ ोगट यांच्याशी भेटण्याची संधी तो अनेकांना मिळवून देत आहे. मंगळवारी स्पेशल स्क्रिनिंग नंतर या चित्रपटासाठी महावीर यांनी आमिरचे व मुंबईकरांचे आभार मानत येथे खूप प्रेम मिळाल्याची कबुली दिली होती. हरियाणाच्या एका बलाली या लहानशा गावातील महावीर सिंग फोगट यांनी आंतराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून, भारतासाठी सुवर्ण पदक मिळविता यावे असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र महावीर यांनी निराश न होता आपल्या मुलींना कुस्ती या खेळात प्राविण्य मिळवून देत आपले स्वप्न पूर्ण करण्याचा केलेला प्रयत्न यात दाखविला आहे. महावीर यांनी चित्रपट पाहिल्यावर ते आमिरचे चाहते झाले असून, सर्वांनी हा चित्रपट पाहावा असे आवाहन केले आहे.आमिरने देखील हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी चित्रपटगृह संचालकांना या तिकिटांचे दर वाढवू नये असे आवाहन केले आहे. दंगल हा चित्रपट उत्तर प्रदेश सरकारने टॅक्स फ्री केला असून ११ राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्र ी व्हावा यासाठी तो प्रयत्न करीत आहे.