हृतिकऐवजी आमिर होणार ‘ठग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 11:24 IST
यशराज बॅनरचा बहुचर्चित चित्रपट ‘ठग’ बऱ्याच काळापासून रखडलेला आहे. ‘धुम ३’ फेम दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्यच्या या चित्रपटात हृतिक ...
हृतिकऐवजी आमिर होणार ‘ठग’
यशराज बॅनरचा बहुचर्चित चित्रपट ‘ठग’ बऱ्याच काळापासून रखडलेला आहे. ‘धुम ३’ फेम दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्यच्या या चित्रपटात हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत असल्याचे बोलले जात होते. खुद्द हृतिकनेदेखील एका मुलाखतीमध्ये या वृत्ताला अंशत: खरे असल्याचे सांगितले होते.मात्र या प्रोजेक्टशी निगडित सुत्रांनुसार हृतिकऐवजी निर्माते आता ‘मि. परफेक्शनिस्ट’ आमिर खानला घेण्याच्या विचारात आहेत. हृतिक आणि निर्मात्यांमध्ये काही तरी बिनसल्यामुळे त्याने हा चित्रपट सोडला असून लवकरच आमिरशी बोलणी केली जाणार असल्याचे कळतेय. असे झाल्यास ‘फना’ आणि ‘धुम ३’ नंतर आमिरची ही तिसरी ‘यशराज’ फिल्म ठरेल.‘ठग’मध्ये आमिर आपल्याला एका पायरेटच्या भूमिकेत पाहायला मिळेल. मुख्य अभिनेत्रीसाठी दीपिकाची निवड झाल्याची माहिती आहे. दंगलची शुटिंगदेखील आता संपली असून आमिरचा पुढचा चित्रपट ‘ठग’ तर नसेल ना? अलिकडे आमिर सहसा एकाच दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचे टाळतो (अपवाद: राजकुमार हिरानी) मात्र, ‘धुम ३’चे अफाट यश पाहता ही शक्यता नाकारता येत नाही.