Join us

ए.आर. रहमान-सायरा बानो या गिटारिस्टमुळे झाले विभक्त? वकिलाने केली पोलखोल, सांगितलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 11:36 IST

A. R. Rahman-Saira Bano Divorce : भारतातील प्रसिद्ध संगीतकार, गायक ए. आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या २९ वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

भारतातील प्रसिद्ध संगीतकार, गायक ए. आर रहमान (A.R.Rehman) आणि त्यांची पत्नी सायरा बानो (Saira Bano) यांनी लग्नाच्या २९ वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. ए. आर. रहमान आणि सायरा बानो यांनी १९ नोव्हेंबरला घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांनी घोषणा केल्याच्या काही तासानंतर त्यांची बँड मेंबर मोहिनी डेने तिच्या पतीपासून विभक्त होत असल्याचे जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली. मोहिनी डेच्या घटस्फोटाच्या पोस्टनंतर नेटकरी ए.आर. रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटाला ती कारणीभूत असेल का, असे तर्कवितर्क लावत आहेत. दरम्यान आता सायरा बानो यांच्या वकिलांनी पोलखोल केली आहे.

ए आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली. यानंतर थोड्याच वेळात ए आर रहमान यांची बँड सदस्य आणि बास गिटार वादक मोहिनी डेनेही तिचा संगीतकार पती मार्क हार्टसचसोबतचे नाते संपुष्टात आणल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्या घटस्फोटाचा संबंध जोडण्यास सुरुवात केली. काही यूजर्सनी तर पती-पत्नीमध्ये 'तिची' एंट्री झाली, त्यानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले, असेही म्हटले आहे. आता सायरा बानो यांच्या वकील वंदना शाह यांनी या प्रकरणावर मौन सोडत सत्य सांगितले आहे.

रहमान यांच्या घटस्फोटाचा मोहिनी डेशी काय आहे संबंध?सायरा बानो यांच्या वकील वंदना शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की ए आर रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटाचा मोहिनी डे यांच्या घटस्फोटाशी काहीही संबंध नाही. ईटाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, 'सायरा आणि ए आर रहमान यांनी हा निर्णय स्वतः घेतला आहे'. वकील वंदना शाह यांनी ए आर रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटाबद्दल पुढे सांगितले की, 'प्रत्येक बराच काळ चाललेला संसार चढ-उतारातून जातो आणि त्यांच्यासोबतही असेच काहीसे घडत होते. मला खूप आनंद आहे की जर ते संपले असेल तर ते सन्माननीय रीतीने झाले आहे. रहमान आणि सायरा दोघेही एकमेकांना सपोर्ट करत राहतील आणि एकमेकांना शुभेच्छा देत राहतील.

घटस्फोटाचा निर्णय का घेतला?वंदना शाह यांनी रहमान आणि सायरा यांच्या घटस्फोट घेण्यामागचे कारण सांगण्यास नकार दिला आणि म्हणाल्या की, 'हे दोघेही खरे आहेत आणि हा निर्णय दोघांनीही विचारपूर्वक घेतला असेल. याला तुम्ही फसवे लग्न म्हणणार नाही. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की त्यांनी घटस्फोट एकमताने घेतला आहे आणि आर्थिक पैलूवर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.

मुलांनी पालकांच्या निर्णयाचा केला आदर ए आर रहमान आणि सायरा बानो यांना तीन मुले आहेत. खतिजा आणि रहीमा या दोन मुली आणि अमीन रहमान नावाचा मुलगा. त्यांच्या या निर्णयात त्यांची मुलेही त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करतात.

टॅग्स :ए. आर. रहमान