Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडपासून दूर शेतात घाम गाळताहेत ८२ वर्षांचे धर्मेन्द्र! पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 13:28 IST

बॉलिवूड सुपरस्टार धर्मेन्द्र सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर एका वेगळ्याच गोष्टीत बिझी आहेत. होय, चमचमत्या बॉलिवूडपासून दूर काळ्या शेतीत  धर्मेन्द्र ...

बॉलिवूड सुपरस्टार धर्मेन्द्र सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर एका वेगळ्याच गोष्टीत बिझी आहेत. होय, चमचमत्या बॉलिवूडपासून दूर काळ्या शेतीत  धर्मेन्द्र राबताहेत. शेतीतील कचरा उचलण्यापासून तर गाईगुरांना चारा भरवण्यापर्यंत अशी सगळी कामे ते करत आहेत. ८२ वर्षांचे धर्मेन्द्र आजही काळ्या मातीशी जुळलेले आहेत. विश्वास बसत नसेल तर तुम्ही त्यांचे हे ताजे व्हिडिओ पाहू शकता. खुद्द धर्मेन्द्र यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे सगळे व्हिडिओ टाकले आहेत.व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कराएका व्हिडिओत ते त्यांच्या शेतात पिकणा-या अलफांजो आंब्यांबद्दल बोलताहेत. ही आंब्याची झाडे स्वत: धर्मेन्द्र यांनी लावली आहेत. दुस-या व्हिडिओत ते गाईला प्रेमाने चारा भरवताना दिसत आहेत.व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक कराधर्मेन्द्र यांचा जन्म पंजाबच्या लुधियानातील नसराली गावात झाला होता. गेल्या ५८ वर्षांपासून धर्मेन्द्र बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.  बॉलिवूडने त्यांना पैसा, प्रसिद्धी, ऐशोआराम सगळे काही दिले. पण  गावातील त्या काळ्या मातीचे ऋण धर्मेन्द्र विसरू शकलेले नाहीत. या वयात त्यांची पावले आपसूक गावाकडे वळतात, त्यांचे हात गावातील मातीत राबतात, यातच सगळे आले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही धर्मेन्द्र बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. लवकरच आपल्या मुलांसोबत ते ‘यमला पगला दीवाना फिर से’मध्ये दिसणार आहेत.अभिनेत्री हेमा मालिनीसोबत लग्न करण्याअगोदर धर्मेंद्रने प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना सनी, बॉबी, अजीता आणि विजेता अशी दोन मुले व दोन मुली आहेत. यांपैकी अजीता आणिज विजेता चंदेरी दुनियेपासून नेहमीच दूर राहिल्या.यशाच्या उच्चशिखरावर असताना धर्मेंद्रच्या जीवनात प्रवेश झाला तो बॉलीवूडची ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीचा. ‘सीता और गीता’, ‘नया जमाना’, ‘तुम हसीन मैं जवान’, ‘शोले’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी सोबत काम केले. हेमासोबत चित्रपट करण्याची एकही संधी ते सोडत नसत. यादरम्यान त्यांचे प्रेम जुळले. हेमापासून त्यांना इशा आणि अहाना या दोन मुली आहेत.