Join us

कंगना राणौत साकारणार ८० वर्षांच्या महिलेची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 21:52 IST

अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा अशाच काहीशा भूमिकेत ती झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच ...

अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा अशाच काहीशा भूमिकेत ती झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावणार असल्याचे स्पष्ट केले होते. अशात वाद आणि यशाच्या घेºयात असलेली कंगना एका चित्रपटावर काम करीत असून, त्यामध्ये कंगनाची भूमिका ही तिच्या फॅन्सना झटका देणारी असणार आहे. कंगना दिग्दर्शन करीत असलेल्या चित्रपटाचे नाव ‘तेजू’ असल्याचे आता स्पष्ट झाले असून, त्यामध्ये कंगना ८० वर्षाच्या एका वृद्ध महिलेची भूमिका साकारणार आहे. ही वृद्ध महिला अशी दाखविण्यात आली जी स्वत:ला कधीच म्हातारी असल्याचे मानत नाही. कंगनाने एका मुलाखतीत म्हटले की, ८० वर्षांच्या या वृद्ध महिलेत कमालीचा उत्साह असतो. एवढे वय असतानाही ती कधीच स्वत:ला वृद्ध म्हणत नाही. कंगनाने दिलेल्या माहितीनुसार ती या चित्रपटाच्या शूटिंगला याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून सुरुवात करणार आहे. हा चित्रपट २०१८ च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा तिला विश्वास वाटतो. या भूमिकेविषयी बोलताना कंगनाने म्हटले की, ‘मी ज्येष्ठ नागरिकांच्या सान्निध्यात लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे मी त्यांच्याबाबत समाजात घडणाºया घटनांचे मला अगदी जवळून निरीक्षण करता आले. ‘तेजू’ हे असेच पात्र असून, ते प्रत्येक वृद्ध महिलेशी साम्य साधणारे असेल. शिवाय यामध्ये माझी भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. कारण मी जरी वयाने लहान असली तरी, विचाराने नक्कीच मोठी आहे. पुढे बोलताना कंगनाने सांगितले की, आज मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येत नाही. एक अभिनेत्री म्हणून असे आव्हाने स्वीकारणे शक्य होत नाही. मात्र अशातही मी केवळ रिबन कापून स्वत:चे आयुष्य जगू शकत नाही, असेही कंगनाने सांगितले. असो, कंगना आता या भूमिकेत कशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर जाणार हे बघणे मजेशीर ठरणार आहे. एक मात्र नक्की कंगनाला वयोवृद्ध महिलेच्या भूमिकेत बघणे मजेशीर असेल.