Join us

7551_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 17:16 IST

उडता पंजाबला केवळ एक कट वगळता प्रदर्शनाला परवानगी दिल्याबद्दल चित्रपटाची टीम खुश आहे. मुंबईत आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन या टीमने आपला आनंद साजरा केला.

उडता पंजाबला केवळ एक कट वगळता प्रदर्शनाला परवानगी दिल्याबद्दल चित्रपटाची टीम खुश आहे. मुंबईत आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन या टीमने आपला आनंद साजरा केला.आपण केवळ बाहेरच्या जगाचे सौंदर्य दाखवितो. खरे काय चालले आहे, ते देखील सांगितले पाहिजे, असे शाहीदने यावेळी सांगितले.ज्यावेळी मला असे कळाले की, या चित्रपटात अनेक कटस् सुचविण्यात आले, त्यावेळी माझा एकच सवाल होता पण का? असे आलिया भट्ट म्हणाली.चित्रपट साईन करण्यामागचे एकच कारण होते, पंजाबचा चित्रपट आहे. मला वाटले, माझ्यासाठी ही छान सुरुवात असल्याचे दिलजित दोसांज म्हणाला.सेन्सॉरशीपमुळे अनेक लहान चित्रपटांचे नुकसान झाले आहे. या पद्धतीत बदल होणे आवश्यक असल्याचे अनुराग कश्यप यांनी सांगितले.टीमने खूप छान काम केले आणि आम्हाला वितरकांनी चांगला पाठिंबा दिला. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे निर्माती एकता कपूरने सांगितले.