Join us

६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 17:22 IST

एक बॉलिवूड अभिनेत्री कॅन्सरचा सामना करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे लाइफ इन ए मेट्रो फेम नफिसा अली. ६८ वर्षीय अभिनेत्री सध्या पेरिटोनियल कॅन्सरशी झुंज देत आहे. 

सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार कॅन्सरशी झुंज देत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगाने निधन झालं. तर हिना खान, दीपिका कक्कर या अभिनेत्रींनाही कॅन्सरचं निदान झालं आहे. आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कॅन्सरचा सामना करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे लाइफ इन ए मेट्रो फेम नफिसा अली. ६८ वर्षीय अभिनेत्री सध्या पेरिटोनियल कॅन्सरशी झुंज देत आहे. 

२०१८ मध्ये पहिल्यांदा नफिसा अली यांना पहिल्यांदा स्टेज ३ पेरिटोनियल कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर यावर उपचार घेत अभिनेत्रीने कॅन्सरला हरवलं होतं. २०१९ मध्ये कॅन्सर फ्री झाल्याची माहिती नफिसा अली यांनी चाहत्यांना दिली होती. मात्र आता पुन्हा त्यांचा कॅन्सर उफाळून आला आहे. नफिसा अली यांना पुन्हा स्टेज ४ पेरिटोनियल कॅन्सरचं निदान झालं असून पुन्हा कर्करोगाचा सामना त्या करत आहेत. पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत. 

"माझ्या प्रवासातील एक नवीन अध्याय आजपासून सुरू होत आहे. काल माझं PET स्कॅन झालं. पुन्हा कीमोथेरेपी सुरू होईल कारण सर्जरी करणं शक्य नाही. मला आयुष्यावर प्रेम आहे", असं त्यांनी म्हटलं आहे. नफिसा अली यांनी त्यांचे काही फोटो शेअर करत "उद्यापासून माझी केमोथेरेपी सुरू होईल" असं त्यात म्हटलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत नफिसा अली यांच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. 

नफिसा अली यांनी त्यांच्या अभिनयाने एक काळ गाजवला. 'जुनून', 'मेजर साब', 'आतंक', 'यमला पगला दिवाना', 'ख्वाब', 'साहेब बीवी और गँगस्टर ३', 'गुजारिश', 'लाइफ इन अ मेट्रो' अशा सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीकर्करोग