Join us

64व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा:'कासव'सिनेमाला सुवर्ण कमळ जाहीर,तर'दशक्रिया'ठरला मराठीतील सर्वोत्कृष्ट सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 14:24 IST

64व्या राष्ट्रीय पुरस्कार 2017 ची घोषणा करण्यात आली असून कासव या सिनेमाला सुवर्णकमळ जाहीर झाला आहे. तर मराठीत 'दशक्रिया' ...

64व्या राष्ट्रीय पुरस्कार 2017 ची घोषणा करण्यात आली असून कासव या सिनेमाला सुवर्णकमळ जाहीर झाला आहे. तर मराठीत 'दशक्रिया' हा सर्वोत्कृष्ट सिनेमा  ठरला. तर हिंदीत 'नीरजा' हा  सर्वोत्कृष्ट सिनेमा  ठरला.राजेश मापुस्कर यांना 'व्हेटिंलेटर' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्याचबरोबर 'व्हेटिंलेटर' सिनेमाला व्हिडीओ रेकॉर्डींग आणि साऊंड मिक्सिंग या कॅटेगिरीत पुरस्कार जाहीर झाला आहे.असे एकूण व्हेंटिलेटरला चार पुरस्कार मिळाले.तर सर्वोत्कृष्ट वेशभुषेसाठी सायकल सिनेमाने बाजी मारली.तर 'नीरजा' सिनेमातील अभिनयासाठी अभिनेत्री सोनम कपूरला विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे.तर 'रूस्तम' सिनेमासाठी खिलाडी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.'दंगल' सिनेमातील झायरा वसीमला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.तर शूजीत सरकारचा 'पिंक' सिनेमाला सोशल इशुच्या कॅटेगिरीचा पुरस्कार जाहीर.'दशक्रिया' सिनेमासाठी सहाय्यक अभिनेता म्हणून मनोज जोशी यांना पुरस्कार जाहीर.त्यामुळे यंदाही 64 व्या  राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीची छाप पाहायला मिळत आहे.64व्या राष्ट्रीय पुरस्कार 2017 ची घोषणा झाली असून 'रूस्तम' सिनेमासाठी खिलाडी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षयने मानले सगळ्यांचे आभार. पाहा हा व्हिडिओ ः