Join us
Daily Top 2Weekly Top 5

6099_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 15:07 IST

जगभरात सर्वोत्तम असल्याची संधी भारतीय कधीच सोडत नाहीत. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीचा प्रमुख म्हणून भारतीय आहे. भारतीय लोक जगातील सर्वात मोठी जिलेबी तयार करतात. भारतीयांनी आतापर्यंत अबाधित ठेवलेले असे विश्वविक्रम आहेत, जे कोणीही तोडू शकत नाहीत. कोट्यवधी भारतीयांना अभिमान वाटावा अशा विश्वविक्रमांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

जगभरात सर्वोत्तम असल्याची संधी भारतीय कधीच सोडत नाहीत. जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीचा प्रमुख म्हणून भारतीय आहे. भारतीय लोक जगातील सर्वात मोठी जिलेबी तयार करतात. भारतीयांनी आतापर्यंत अबाधित ठेवलेले असे विश्वविक्रम आहेत, जे कोणीही तोडू शकत नाहीत. कोट्यवधी भारतीयांना अभिमान वाटावा अशा विश्वविक्रमांची माहिती या ठिकाणी देत आहोत.३७ वर्षीय कलामंडलम हेमलता या केरळच्या डान्सिंग क्वीन आहेत. त्यांनी सलग १२३ तास १५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला आहे. पाच दिवस कोणतीही झोप न घेता अथवा टी. व्ही. न पाहता हा विश्वविक्रम केला. अद्वितीय!गुजरातच्या सौम्या ठक्कर आणि शकुंतला पांड्या यांनी रस्ता सुरक्षिततेसाठी सर्वात मोठा थ्री डी झेब्रा क्रॉसिंग तयार केला. लक्षात घ्या तुम्ही सर्वात वेगाने गाडी चालवत आहात आणि अचानक तुम्ही पाण्यात पडत आहात की काय असे वाटते, त्यावेळी तुम्ही काय कराल? हे रस्ता सुरक्षेसाठी उपयुक्त आहे का?हैदराबाद येथील खुर्शीद हुसेन याने नाकाने सर्वाधिक शब्द टाईप करण्याचा सात वर्षांचा विक्रम मोडला. ४७ सेकंदात त्याने १०३ शब्द टाईप केले. हा विश्वविक्रम आहे. जे लोक हाताने टाईप करतात, त्यांनी काय म्हणावे.बिसलेरीने ११ दशलक्ष प्लॅस्टीक बॉटल्स १०५ शाळांमधून आणि २ लाख विद्यार्थ्यांमधून रिसायक्लिंगसाठी गोळा केल्या. स्वच्छ भारत प्लॅस्टीक बॉटल रिसायक्लिंग कार्यक्रमांतर्गत या गोळा करण्यात आल्या. बिसलेरीने २५ हजार किलो प्लॅस्टीक बॉटल्स गोळा केल्या. अमेरिकेत यापूर्वी गोळा केलेल्या बॉटल्सपेक्षा दहा हजार किलो अधिक वजनाच्या होत्या.५८ वर्षीय राम सिंग चौहान हे १९७० पासून आपल्या मिशा वाढवित आहेत. आता त्यांची लांबी १४ फुट इतकी झाली आहे. ‘पुरुषार्था’चे लक्षण असलेली मिशा घेऊन ते सर्वत्र फिरत असतात.मुंबईमध्ये १८ किलो वजनाची आणि ९ फूट लांबीची जिलेबी तयार करण्यात आली. शेफ संजीव कपूर यावेळी उपस्थित होते. यासाठी शेफना ५३ मिनिटे लागली. ४० मिनिटांपेक्षा कमी कालावधीत ही जिलेबी तयार करुन विश्वविक्रम केला.कोचीमध्ये बाहुबली या चित्रपटाचे ५० हजार चौरस फूट इतक्या क्षेत्रात बसेल असे पोस्टर तयार करण्यात आले. गाजलेल्या या चित्रपटाचे पोस्टरदेखील तितकेच गाजले.