Join us

​करिना कपूरला आगामी सिनेमासाठी ६ कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 14:14 IST

करिना कपूर सध्या तिच्या जुन्या फिगरमध्ये परतण्यासाठी मेहनत घेताना दिसतेय. रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिना दिसणार ...

करिना कपूर सध्या तिच्या जुन्या फिगरमध्ये परतण्यासाठी मेहनत घेताना दिसतेय. रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिना दिसणार असल्याचे म्हटले जातेय.  खरे तर‘पतौडी बहू’ प्रेग्नंसीदरम्यानच या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार होती आणि उरलेले शूटींग बाळाच्या जन्मानंतरच आटोपणार होती. पण यानंतर वेगवेगळ्या बातम्या कानावर आल्या. एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सने या चित्रपटाला पैसा देण्यास नकार दिला, चित्रपटाचा बजेट खूप वाढला, असे काय काय ऐकायला मिळाले. त्यामुळे तूर्तास तरी ‘वीरे दी वेडिंग’चे शूटींग सुरु होईल की, नाही, त्याबद्दल दाव्यानिशी काहीही सांगता येणार नाही. पण याबद्दल नाही तर आम्ही एक वेगळीच बातमी तुम्हाला देणार आहोत. होय, करिनाला म्हणे, एक महत्त्वपूर्ण भूमिका आॅफर झाली आहे. खास करिनाला समोर ठेवून ही भूमिका लिहिली गेली आहे आणि या चित्रपटासाठी करिनाला तब्बल ६ कोटी रूपयांचे मानधन मिळणार असल्याचीही खबर आहे. अद्याप करिनाने हा चित्रपट साईन केला वा नाही, हे स्पष्ट झालेले नाही. पण आमच्यामते, इतकी तगडी भूमिका आणि इतके तगडे मानधन मिळत असताना हा प्रोजेक्ट नाकारण्याचे करिनाकडे काहीही कारण नाही.एका मुलाची आई होऊनही करिनाची मागणी घटलेली नाही, हेच यावरून स्पष्ट होते. करिना कपूर बॉलिवूडची एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. आता करिनाला तिच्या जुन्या ग्लॅमरस अंदाजात पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा कधी संपणार, ते लवकरच दिसेल. आर. बल्की यांचा ‘की अ‍ॅण्ड का’ या सिनेमात करिना अखेरची दिसली होती.