5881_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 15:28 IST
आपल्या घरात पाळीव प्राणी असावा अशी जवळपास सगळ्यांची भावना असते. त्यामध्येही कुत्र्यांच्या अनेक प्रजाती पाळण्याची हौस अनेकांना असते. असे प्राणी दोन प्रकारचे असतात. नवनवीन सांगितलेल्या गोष्टी अगदी तातडीने शिकणारे आणि प्रामाणिक. जगभरात सुमारे १३३ कुत्र्यांच्या प्रजाती आहेत. यापैकी काही लोकप्रिय कुत्र्यांच्या प्रजातीची माहिती या ठिकाणी देत आहोत.
5881_article
आपल्या घरात पाळीव प्राणी असावा अशी जवळपास सगळ्यांची भावना असते. त्यामध्येही कुत्र्यांच्या अनेक प्रजाती पाळण्याची हौस अनेकांना असते. असे प्राणी दोन प्रकारचे असतात. नवनवीन सांगितलेल्या गोष्टी अगदी तातडीने शिकणारे आणि प्रामाणिक. जगभरात सुमारे १३३ कुत्र्यांच्या प्रजाती आहेत. यापैकी काही लोकप्रिय कुत्र्यांच्या प्रजातीची माहिती या ठिकाणी देत आहोत.मुळत: याला स्कॉच शीप डॉग असेही म्हणतात. इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या सीमेवर बॉर्डर कोली प्रजातीची कुत्री आढळतात. ही प्रजाती स्वतंत्ररित्या राहते आणि मेंढपाळामध्ये वाढते. महत्वाचे प्रश्न हाताळण्यास या प्रजातीस थोडी अडचण येते. मात्र कामाच्या बाबतीत खूप अग्रेसर असतात. जर्मनीमध्ये ही प्रजाती आढळते. पक्ष्यांची शिकार आणि पाण्याच्या शोधासाठी याचा वापर केला जातो. त्यांना दिलेले काम ते चोखपणे पार पाडतात. ही प्रजाती अत्यंत प्रेमळ, लवकर शिकणारी आणि विनोदी असते. सध्याची जर्मन शेफर्ड ही प्रजाती १८८९ साली कॅप्टन मॅक्स व्हॉन स्टेफॅनिट्झ यांनी निर्माण केली. वापर आणि हुशारीच्या दृष्टीने जर्मन शेफर्ड उपयोगी आहेत. पोलीस आणि कुत्र्यांच्या क्लबमध्ये याचा मोठा वावर आहे. स्कॉटलंड येथील मुळ प्रजाती. १८६५ साली याचे क्रॉस ब्रीड करुन स्कॉटलंडमधील गुईश्चान येथील लॉर्ड ट्वीडमाऊथ यांनी याचे निर्माण केले. दिसायला अत्यंत सुंदर, चपळ आणि आज्ञाधारक प्रजाती आहे. डॉबरमन पिंश्चर ही प्रजाती मुळची जर्मन येथील. वसुलीला जाणाºयांसाठी सुरक्षा म्हणून त्यांना तयार करण्यात आले. सध्याचे डॉबरमन हे फारसे आक्रमक नसतात आणि अगदी पाळीव प्राण्याप्रमाणे राहतात. त्यांना खेळायला आवडते आणि खूप प्रामाणिक असतात. शेटलँड शीपडॉग हे कोलीप्रमाणेच असतात. शेटलँड आईसलँड भागात हे अधिक आढळून येतात. ही एकमेव प्रजाती आहे. खेळकर, उत्साहवर्धक आणि घरातील, शेतातील कामे करणारी प्रजाती म्हणून ओळखली जाते. सलग २३ वर्षे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय प्रजाती म्हणून लॅब्राडोरला ओळखले जाते. गळ्याजवळ जाड कोटिंग असणारे, जाळीदार पाय असणारे, मोठे शेपूट तसेच थंड पाण्यातही दूरवर पोहोणारे म्हणून याची ओळख आहे. शिकारीसाठी, पाण्यातून सोडविण्यासाठी याचा वापर केला जाते.