Join us

5635_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 15:00 IST

आता एकाच गावात जन्मलो, वाढलो आणि काम केले हा ट्रेंड बदलला आहे. लोक आता काम करण्यासाठी नवे वातावरण, नव्या संधी आणि जगभरातील नवनवीन शहरे शोधत असतात. अशी अनेक ठिकाणे आहेत, जी राहण्यासाठी उत्तम आहेत. उच्च राहणीमान, सुरक्षितता, नोकरीच्या नव्या संधी, पगार आणि मुलांना परदेशात राहण्यासाठी योग्य जागा हे सर्व पाहिले जाते. जगभरातील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत.

आता एकाच गावात जन्मलो, वाढलो आणि काम केले हा ट्रेंड बदलला आहे. लोक आता काम करण्यासाठी नवे वातावरण, नव्या संधी आणि जगभरातील नवनवीन शहरे शोधत असतात. अशी अनेक ठिकाणे आहेत, जी राहण्यासाठी उत्तम आहेत. उच्च राहणीमान, सुरक्षितता, नोकरीच्या नव्या संधी, पगार आणि मुलांना परदेशात राहण्यासाठी योग्य जागा हे सर्व पाहिले जाते. जगभरातील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत.आर्थिक स्थितीबद्दल समाधानी असलेल्या इक्वेडोअरच्या नागरिकांची जीवनशैली आनंदी आहे. तुम्हाला सगळ्याच ठिकाणी अगदी घरी आल्यासारखं जाणवते. तथापि, काही जणांना भाषेची अडचण जाणवू शकते. एका सर्वेक्षणानुसार इक्वेडोरमध्ये स्पॅनिश बोलता न येता राहणे खूपच अवघड आहे. त्याचवेळी बºयाच जणांचे म्हणणे आहे की, स्पॅनिश भाषा शिकायला सोपी आहे. वैयक्तिक आनंदाचा विचार केला तर अनेकांना याच देशात रहावेसे वाटते.करिअरच्या उद्देशाने आलेल्या परदेशी नागरिकांसाठी हा छोटासा छान देश आहे. जवळपास ४० टक्के परदेशी नागरिक या देशात राहतात. परदेशींना आकर्षित करण्यासाठी हा देश अग्रेसर आहे. इतर देशातील नागरिकांशी मिसळणे देखील सोपे आहे. आरोग्य आणि सुरक्षाही उत्तम आहे. स्थानिक लोकांशी मैत्री करताना अडचणी निर्माण होतात.वैयक्तिक आनंदाच्या बाबतीत हा देश अग्रेसर आहे. परदेशींना हा देश आपल्या घरच्यासारखा वाटतो. नोकरीसाठी या ठिकाणी राहणे हे जरी प्राथमिक लक्ष असले तरी अनेक लोक या देशाच्या प्रेमात पडलेले आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत या देशात अडचण आहे. २०११ नंतर मेक्सिको शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे.जीवनशैलीच्या बाबतीत हा पर्वतीय देश उत्तम आहे. बरेचसे परदेशी नागरिक या ठिकाणी बँकींग व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्राच्या हिशोबाने येतात. झुरीच हे शहर अत्यंत उच्च राहणीमान असणाºयांचे शहर आहे. या शहरात अनेक परदेशी नागरिक राहिलेले आहेत. शहरात रेल्वे, ट्राम, बसेस अगदी सहज उपलब्ध होतात. या देशातील उत्तम नैसर्गिक ठिकाणे लोकांना अधिक भावतात.अमेरिकेत दरवर्षी परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. या ठिकाणचे वास्तव्य आणि नागरिकांमुळे लोकांना हा देश आवडतो. न्यूयॉर्क शहर अनेक नोकरीच्या संधी मिळवून देते. विविध देशातील नागरिक एकत्र राहत असल्याने परदेशी नागरिकांचे हे आवडते ठिकाण आहे.ज्यावेळी आपण उत्तम जीवनशैलीचा विचार करतो, त्यावेळी सिंगापूरचे नाव वरच्या क्रमांकावर येते. वयात येणाºया मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि काळजी घेण्यासाठी हा देश उत्कृष्ट आहे. या ठिकाणी परदेशी नागरिकांना आकर्षक पगार मिळतो, त्याशिवाय करही खूप कमी आहेत आणि नोकरीच्या संधी आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही उत्तम आहे.उत्तम वातावरण, वर्षभर सूर्यप्रकाश यामुळे परदेशी नागरिकांसाठी हे आवडीचे ठिकाण आहे. उत्तम कौशल्ये असणाºयांना हा देश नोकरीच्या बºयाच संधी उपलब्ध करुन देतो.