5603_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 15:49 IST
कॅसिनो काय असतो, तिथे जाऊन लोक काय करतात हे आपणा सर्वांना ठावूक आहे. परंतु ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी एका शब्दात. कॅसिनो असे एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी एक प्रकारचा जुगार खेळला जातो. कॅसिनोमध्ये श्रीमंत लोक जुगार खेळण्यास येतात. एक वेळ अशी येते की, श्रीमंतांना देखील जागेअभावी बाहेर थांबावे लागते. ‘श्रीमंतापेक्षा श्रीमंत’ असलेला हा खेळ आहे. जगभरातील अशाच अलिशान आणि महागड्या कॅसिनोजची माहिती देत आहोत.
5603_article
कॅसिनो काय असतो, तिथे जाऊन लोक काय करतात हे आपणा सर्वांना ठावूक आहे. परंतु ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी एका शब्दात. कॅसिनो असे एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी एक प्रकारचा जुगार खेळला जातो. कॅसिनोमध्ये श्रीमंत लोक जुगार खेळण्यास येतात. एक वेळ अशी येते की, श्रीमंतांना देखील जागेअभावी बाहेर थांबावे लागते. ‘श्रीमंतापेक्षा श्रीमंत’ असलेला हा खेळ आहे. जगभरातील अशाच अलिशान आणि महागड्या कॅसिनोजची माहिती देत आहोत.मकाऊ येथील सर्वात महागडे आणि अलिशान कॅसिनो आहे. क्षेत्राच्या हिशोबाने ही जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी इमारत आहे. या कॅसिनोमध्ये ३ लाख ७६ हजार चौरस फुट जागा असून, १८५० गेमिंग मशिन्स आहेत. त्याशिवाय पोकर गेमसाठी ६०० टेबल्स आहेत. या इमारतीमध्ये २६ रेस्टॉरंट्स असून, दोन बार आहेत. या हॉटेलमध्ये ३००० सुट्स आहेत. मकाऊमध्ये असलेला वेन मकाऊ हा जगातील दुसºया क्रमांकाचा कॅसिनो आहे. हॉटेल कम कॅसिनो असलेल्या या कॅसिनोमध्ये जीवनकला ही थिम घेऊन डेकोरेशन करण्यात आले आहे. वेन रिसॉर्ट लिमिटेड कंपनीच्या हे मालकीचे आहे. यामध्ये गेमिंग रुम, रेस्टॉरंट्स, दुकाने, स्पा आणि तलावही आहे. याठिकाणी ६७२ गेमिंग मशिन्स असून, ४६२ टेबल्स आहेत. माँटे कार्लो कॅसिनो किंवा कॅसिनो डी माँटे कार्लो हे मोनॅकोमध्ये आहे. या गेमिंग परिसरात स्थानिक मोनॅकोवासियांना जाण्यास परवानगी नाही. हे आश्चर्यकारक असले तरी खरे आहे. जेम्स बाँडच्या कथानकात या कॅसिनोचा बºयाचवेळा उल्लेख आलेला आहे. लेबनॉनमधील ममेलटिनमध्ये हा कॅसिनो आहे. यामध्ये ४०० स्लॉट मशिन्स आणि ५० गेमिंग टेबल्स आहेत. ३५ हजार चौरस मीटर इतका या इमारतीचा परिसर आहे. १९८९ साली हा कायमस्वरुपी बंद करण्यात आला होता, ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केल्यानंतर १९९६ साली पुन्हा उघडण्यात आला. इतर सुंदर कॅसिनोप्रमाणेच सेंट इग्विन गोल्फ रिसॉर्ट आणि कॅसिनो आहे. पार्क हयातमधील या कॅसिनोची सुंदर वास्तूरचना आहे. ब्रिटीश कोलंबियामध्ये याची स्थापना करण्यात आली. रॉकी आणि पुरसेल पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. तुम्ही ज्यावेळी याची माहिती घ्यायला जाल, त्यावेळी तुम्हाला या हॉटेलची प्रत्येक गोष्ट लिखीत स्वरुपात दिसेल. अर्जेंटिनाच्या मेंडोजा शहरात पार्क हयात मेंडोजा वसलेले आहे. पार्क हयातमधील विख्यात कॅसिनो आहे. या हॉटेलमध्ये राहणाºया प्रत्येकास कॉम्प्लिमेंटरी म्हणून नाष्टा दिला जातो. रात्रीच्या जेवणावेळी खास वाईन दिली जाते. पर्यटकांसाठीचे हे उत्तम हॉटेल आहे. दि कास्मोपॉलिटियन हे जगातील विख्यात कॅसिनोपैकी एक. लास वेगास शहरात आहे. याठिकाणी सर्व काही आश्चर्यकारक आहे. या हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला ओळखपत्र सोबत न्यावे लागते.