५४ वर्षीय शेखर सुमनने केले ट्रान्सफॉर्मेशन; बनविले सिक्स पॅक अॅब्स, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:11 IST
५४ वर्षीय अभिनेता तथा होस्ट शेखर सुमन सध्या त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. त्याने ट्रान्सफॉर्मेशन केले असून, ...
५४ वर्षीय शेखर सुमनने केले ट्रान्सफॉर्मेशन; बनविले सिक्स पॅक अॅब्स, पहा फोटो!
५४ वर्षीय अभिनेता तथा होस्ट शेखर सुमन सध्या त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. त्याने ट्रान्सफॉर्मेशन केले असून, सिक्स पॅक अॅब्स बनविले आहे. जिममध्ये बायसेप्स बनवितानाचे त्याचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याबद्दल त्याचे कौतुकही केले जात आहे. या फोटोमध्ये शेखर जिममधील एका मशीनवर बसलेला दिसत आहे. शेखरचे हे सर्व फोटोज् त्याचा मुलगा अध्ययन सुमन याने क्लिक केले आहेत. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरही हे सर्व फोटो कव्हरपेजवर ठेवले आहेत. दोन महिने अगोदर आलेल्या ‘भूमी’ या चित्रपटात बºयाच काळानंतर शेखर सुमन बघावयास मिळाला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही, परंतु त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. शेखरने १९८४ मध्ये आलेल्या ‘उत्सव’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटात त्याच्यासोबत रेखा आणि शशी कपूर मुख्य भूमिकेत होते. याव्यतिरिक्त ‘नाचे मयूरी, अनुभव, संसार, त्रिदेव, प्रोफेसर की पडोसन, चोर मचाए शोर, चलो मुवी’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र अशातही तो इंडस्ट्रीत म्हणावी तशी ओळख निर्माण करू शकला नाही. त्याने मुलगा अध्ययनकरिता ‘हार्टलेस’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले, परंतु हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. शेखरला चित्रपटांच्या तुलनेत टीव्हीवर अधिक यश मिळाले. त्याने सब टीव्हीवरील ‘मूवर्स अॅण्ड शेखर्स’ हा शो होस्ट केला. या शोने त्याला छोट्या पडद्यावर एक वेगळीच ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने ‘मैं अनाडी तू खिलाडी, हेरा फेरी, कभी इधर कभी उधर, अंदाज, विलायती बाबू, एक था राजा एक थी रानी, देख भाई देख, दम दमा दम’ आदींसह अनेक शोमध्ये काम केले. त्याचबरोबर ‘कॉमेडी सुपरस्टार, लाइफ इंडिया लाइफ, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हे शोदेखील होस्ट केले.