5368_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 21:44 IST
टाईम मॅगझीनने गुरुवारी जगातील १०० सर्वाधिक प्रभावी व्यक्तिंची यादी जारी केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत तर प्रियंका चोपडा, सानिया मिर्झा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघूराम राजन यांची नावे आहेत.
5368_article
टाईम मॅगझीनने गुरुवारी जगातील १०० सर्वाधिक प्रभावी व्यक्तिंची यादी जारी केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत तर प्रियंका चोपडा, सानिया मिर्झा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघूराम राजन यांची नावे आहेत. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत तर प्रियंका चोपडा, सानिया मिर्झा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघूराम राजन यांची नावे आहेत. विशेष म्हणजे प्रियंकाला मॅगझीनच्या कव्हरवर जागा मिळाली आहे. ही लिस्ट पाच भागांत विभागली गेली आहे. पायोनियर्स, टाइटन्स, आर्टिस्ट, लीडर्स आणि आयकन्स अशी. पायोनियर्स लिस्टमध्ये भारतीय वंशाचे अजीज अन्सारी, सुनीता नारायण, राज पंजाबी यांची नावे आहेत. अजीज अन्सारी तामिळनाडूच्या एका मुस्लिम कुटुंबातून आलेले अॅक्टर व कॉमेडियन आहेत. एनबीसी सीरिज Parks and Recreation ने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. टाइटन्समध्ये फ्लिपकार्टचे बिन्नी व सचिन बन्सल तसेच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची नावे आहेत. प्रियंकाला आर्टिस्ट कॅटेगिरीत स्थान मिळाले आहे. आइकन्समध्ये सानिया मिर्झा हिला स्थान मिळाले आहे. रघुराम राजन भारतातील सर्वाधिक पॉवरफुल व्यक्ति असल्याचे या यादीत म्हटले आहे.