Join us

5312_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 15:01 IST

बºयाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणी कॉफी पिण्याचा छंद असतो. अनेक जण कोणत्या ठिकाणी छान गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेता येईल, याचा विचार करीत असतात. गप्पा, मैफल असावी आणि सोबत कॉफी असावी, वाह क्या बात है! भारतामधीलच नव्हे तर जगभरातील नागरिकांच्या अशाच अपेक्षा असतात. या ठिकाणी जगभरातील सर्वोत्कृष्ट कॉफी शॉपची माहिती या ठिकाणी देत आहोत.

बºयाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणी कॉफी पिण्याचा छंद असतो. अनेक जण कोणत्या ठिकाणी छान गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेता येईल, याचा विचार करीत असतात. गप्पा, मैफल असावी आणि सोबत कॉफी असावी, वाह क्या बात है! भारतामधीलच नव्हे तर जगभरातील नागरिकांच्या अशाच अपेक्षा असतात. या ठिकाणी जगभरातील सर्वोत्कृष्ट कॉफी शॉपची माहिती या ठिकाणी देत आहोत.साध्या आणि अचूक ठिकाणी जाऊन, कॉफीचा आस्वाद घेण्याची इटालियन लोकांची खासियत आहे. दिवसभरात अनेक वेळा ते कॉफी पित असतात. हाताने तयार केलेली अथवा इस्प्रेसो मशीनने तयार केलेली असो. या ठिकाणची कॉफी ही उत्तमच असते. मजेदार सरबती, चॉकलेट असणारी किंवा दुधाची असो. इटालियान एस्प्रेसो मध्ये पारंपरिक पद्धतीने अगदी उभे राहून कॉफी पिता येते.व्हिएतनामसारखी कॉफी जगात इतर ठिकाणी फारशी बनत नाही. कॉफी बनविण्याच्या यंत्रात गरम पाणी ओतले जाते. एका ग्लासमध्ये गडद, करड्या रंगाची धान्ये असतात. काळा द्रव त्यात टाकला जातो. त्यानंतर घट्ट, गोड आणि खव्यासारखे दूध त्यात टाकले जाते. यामध्ये हाताने बर्फाचे तुकडे टाकून ते ढवळले जाते.कप आणि खोलगट बशी एकत्र आले की केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही तरी वेगळे मिळणार असल्याची जाणीव होते. स्थानिक ठिकाणी पिकविण्यात येणाºया कॉफीला भाजून, नंतर त्याला दळून, त्यानी छाननी करुन त्यात दूध टाकले जाते. नंतर कप आणि बशीत ते विसळण्यात येते. त्यानंतर तयार होते छान कॉफी.मोरोक्को येथे कॉफी संस्कृती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या देशात अनेक कॅफे आहेत. फ्रेंच पद्धतीने, रस्त्याशेजारी खुर्च्या टाकून ही कॅफे सुरू असतात. नॉस-नॉस म्हणजे अर्धे-अर्धे. अर्धी कॉफी आणि अर्धे गरम दूध. छोट्या ग्लासमध्ये ठेवून अत्यंत कडक, चवदार कॉफी पिता येते.ब्युनोस आयर्समध्ये कोणताही कार्यक्रम कॅफे कोर्टाडोशिवाय पूर्ण होत नाही. हे अगदी नॉस-नॉस सारखेच आहे. अर्धी कॉफी कॉफी आणि अर्धे गरम, सौम्य फेस असलेले दूध टाकण्यात येते. या ठिकाणी अनेक मित्र एकत्र येऊन बसलले या ठिकाणी दिसतील.इपॉव्ह राज्यात याची सुरुवात झाली. कोळसा आणि धूर याची किंचीत चव या कॉफीला आलेली असते. या कॉफीला मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.फ्लाईट व्हाईट येथे अगदी साधे आणि परिणामकारक पेय मिळते. गरम, फेसाळ दूध टाका. त्याला कोणताही सरबती वास नसतो, चॉकलेटसारखी चव नसते. केवळ कॉफी आणि दूध इतकेच असते.