Join us
Daily Top 2Weekly Top 5

५२ वर्षीय अभिनेत्री महिमा चौधरी दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, जाहीरपणे दिलं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:17 IST

Mahima Chaudhary : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महिमा चौधरीच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा वारंवार समोर येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महिमा चौधरीच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा वारंवार समोर येत आहे. इतकेच नाही, तर ५२ वर्षांची ही अभिनेत्री स्वतः अनेकदा लग्नाबद्दल बोलली आहे आणि पुन्हा एकदा महिमा चौधरीने पापाराझींसमोर आपल्या लग्नाचा उल्लेख करून सगळ्यांनाच चकित केले आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे की, ती आज दुसरे लग्न करणार आहे.

महिमा चौधरी गेल्या काही दिवसांपासून लोकांना चकित करत आहे. ती जिथे कुठे दिसते, तिथे आपल्या लग्नाचा उल्लेख करताना दिसते. ५२ वर्षांच्या वयात महिमा खरोखरच दुसरे लग्न करणार आहे की काय, असा प्रश्न लोकांना पडला आहे. नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान तिची पापाराझींसोबत भेट झाली, तेव्हा तिने पुन्हा आपल्या लग्नाचा विषय काढला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिमा बाहेर पडत होती. तेवढ्यात पापाराझींनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती म्हणाली की, "उद्या माझे लग्न होणार आहे" आणि हसून पुढे निघून गेली.

आता जर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही मनात प्रश्न आला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, महिमा चौधरी कोणतेही लग्न वगैरे करत नाही. ती हे सर्व तिचा आगामी चित्रपट 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'च्या प्रमोशनसाठी करत आहे. या चित्रपटात ती संजय मिश्रासोबत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती इतकी व्यग्र आहे की, अनेकदा नवरीप्रमाणे लाल रंगाच्या पोशाखातही दिसली आहे.

'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'ची कथा'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' या चित्रपटाची कथा एका मुलाभोवती फिरते, जो स्वतःच्या लग्नाच्या नादात आपल्या वडिलांचे दुसरे लग्न लावून देण्याच्या मिशनला लागतो. असे करण्याचे कारण असे की, त्याच्या सासरच्या लोकांची इच्छा होती की त्यांच्या घरात एक महिला असावी. आता हे लग्न कसे होते आणि दुसरी आई शोधताना कोणत्या प्रकारची आव्हाने येतात, हे अत्यंत मनोरंजक पद्धतीने या कथेत गुंफले आहे. या चित्रपटात संजय मिश्रा, व्योम यादव आणि महिमा चौधरी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahima Chaudhary, 52, Announces Second Marriage, Extends Public Invitation

Web Summary : Actress Mahima Chaudhary is creating buzz about her 'second marriage'. This is actually a promotional stunt for her upcoming film, 'Durlabh Prasad Ki Dusri Shadi,' where she stars with Sanjay Mishra. The movie revolves around a son trying to find a second wife for his father.
टॅग्स :महिमा चौधरी