४७ वर्षांची पूजा बेदी पुन्हा पडली प्रेमात! कोट्यधीश उद्योगपतीला करतेयं डेट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 11:50 IST
अभिनेता आमिर खान स्टारर ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी ही ...
४७ वर्षांची पूजा बेदी पुन्हा पडली प्रेमात! कोट्यधीश उद्योगपतीला करतेयं डेट!!
अभिनेता आमिर खान स्टारर ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी ही पुन्हा एका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. होय, ४७ वर्षांची पूजा पुन्हा प्रेमात पडल्याची खबर आहे. सध्या पूजा एका उद्योगपतीला डेट करत असल्याचे कळतेय. हा उद्योगपती दुसरा कुणी नाही तर पूजाचा शाळेतला मित्र मैनेक कॉन्ट्रेक्टर आहे. पूजा कायम तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. सध्या पूजा व मैनेकच्या नात्याची चर्चा जोरात आहे. पूजा व मैनेक दोघेही लॉरेन्स स्कूल सोनावरमध्ये एकत्र शिकले. अर्थात मैनेक हा पूजाचा सीनिअर होता. शाळेच्या त्या दिवसांत तीन वर्षे सीनिअर असलेल्या मैनेकसोबत पूजा कधीच बोलली नाही. पण अलीकडे व्हाट्सअॅप ग्रूपच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली आणि पुढे मैत्री. आता ही मैत्री पे्रमात बदलली आहे. एका ताज्या मुलाखतीत खुद्द पूजाने मैनेकला डेट करत असल्याचे सांगितले आहे. मैनेक गोव्यात राहतो. येथे त्याचे एक रेस्टॉरंट आहे. गतवर्षी पूजा गोव्यात गेली असता मैनेकच्या घरीच थांबली होती.सन १९९४ मध्ये पूजाने फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले होते. त्यापूर्वी दोघेही सुमारे साडे तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या १२ वर्षांनंतर पूजा व फरहान यांचा घटस्फोट झाला. २०१३ या वर्षी व्हॅलेंटाइन डेला या दोघांनी त्यांच्या घटस्फोटाची आॅफिशियल अनाउंसमेंट केली होती. यानंतर अभिनेता आदित्य पांचोली, हनिफ, द्विती विक्रमादित्य,आकाशदीप यांच्याशी तिचे नाव जोडले गेले.ALSO READ : आपल्या अटींवर जगतेय पूजा बेदी! आजही तितकीच बोल्ड अन् ग्लॅमरस!!हनिफ आणि पूजा ‘नच बलिए-३’ या डान्स रिअॅलिटी शोदरम्यान जवळ आले. हनिफनंतर युनायटेड नेशन्स डेव्हलेपमेंट प्रोग्रामचा असोसिएट द्विती विक्रमादित्यसोबत पूजा काही काळ रिलेशनशिपमध्ये होती. पूजाने तिचा ४०वा वाढदिवस द्विती आणि दोन मुलांसह गोवा येथे सेलिब्रेट केला होता. पुढे दोघांनी साखरपुडाही केला. मात्र कुटुंबांची या नात्याला संमती नसल्याने दोघांना विभक्त व्हावे लागले. पूजा आणि आकाशदीप ‘बिग बॉस’च्या सीजन5 दरम्यान जवळ आले होते. शो संपल्यानंतर दोघांमधील नाते अधिक घट्ट झाले होते. आकाशदीपने तर त्याच्या बायसेफवर पूजाचे नावही गोंदले होते. ज्यातून दोघांमधील नाते पुढेही कायम राहणार असेच काहीसे वाटत होते. मात्र यांचेही नाते फार काळ टिकले नाही.