Join us
Daily Top 2Weekly Top 5

४४ वर्षांची झाली शाहरूख खानची मेहबूबा !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST

अभिनेत्री महिमा चौधरी ४४ वर्षांची झाली आहे. होय, १३ सप्टेंबर १९७३ रोजी दार्जिलिंग येथे जन्मलेल्या महिमाने तिचा ४४ वा वाढदिवस साजरा केला आहे.

अभिनेत्री महिमा चौधरी ४४ वर्षांची झाली आहे. होय, १३ सप्टेंबर १९७३ रोजी दार्जिलिंग येथे जन्मलेल्या महिमाने तिचा ४४ वा वाढदिवस साजरा केला आहे. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या सुभाष घई यांच्या ‘परदेश’ या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.‘परदेश’साठी महिमाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अवॉर्डही मिळाला. महिमाचे खरे नवा ऋतू चौधरी असे आहे. ‘महिमा’ हे नाव सुभाष घई यांनी दिले आहे. महिमाने ‘दाग : द फायर, लज्जा, धडकन, बागबान आणि सॅँडविच’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. २००६ मध्ये महिमाने मुंबईतील उद्योगपती बॉबी मुखर्जी यांच्याशी विवाह केला. बॉबी अगोदरच विवाहित होते, त्यांना दोन मुलेही होती. बॉबी आणि महिमाची एक मुलगी आहे.