४४ वर्षीय मलाइका अरोराचा पुन्हा दिसला हॉट अवतार, शेअर केला बिकिनी फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:33 IST
४४ वर्षीय मलाइका अरोरा आजही प्रचंड सुंदर दिसत असून, तिचा हॉट अंदाज घायाळ करणारा आहे. नुकताच तिने एक बिकिनी फोटो शेअर केला असून, त्यात ती खूपच हॉट दिसत आहे.
४४ वर्षीय मलाइका अरोराचा पुन्हा दिसला हॉट अवतार, शेअर केला बिकिनी फोटो!
४४ वर्षीय मलाइका अरोरा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अधिकाधिक वेळ जीममध्ये वर्कआउट करण्यात घालविते. त्यामुळेच या वयातही ती खूपच ग्लॅमरस दिसत असून, तिच्या अदा घायाळ करणाºया आहेत. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती व्हाइट बिकिनीत गोवा येथील बीचवर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने Sundazeeeeeeee..... #happysundayeveryone असे लिहिले आहे. मलाइकाच्या या फोटोला तिच्या चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळत आहे. १५ वर्षीय मुलाची आई असलेली मलाइका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे जीममध्ये जाणे पसंत करते. मलाइकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी माझ्या आहारात पालेभाज्यांचा अधिक वापर करते. या व्यतिरिक्त ती अॅण्टी आॅक्सिडेंट फूडचाही वापर करते. एकूणच मलाइका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वर्कआउटबरोबर खानपानावरही विशेष लक्ष देऊन आहे. त्याचबरोबर मलाइका बरेचसे आउटडोर स्पोर्ट्स खेळणे पसंत करते. दररोज किमान अर्धा तास स्विमिंग, सायकलिंग आणि जॉगिंगला ती प्राधान्य देते. तिच्या फिटनेस वेळापत्रकात योगा, डान्स, वेट ट्रेनिंग आणि किक बॉक्सिंगचा समावेश आहे. मलाइका तिच्या दिवसाची सुरुवात अतिशय हेल्दी विचाराने करणे पसंत करते. ज्यामुळे तिला एनर्जी मिळते. तिला पास्ता खूप आवडतो. त्याचबरोबर दररोज बादाम मिल्क, इलायची पाउडर आणि मधाचे सेवन करते. मलाइका मिठाईपासून दूर आहे. एकूणच मलाइकाच्या सौंदर्याचे रहस्य डायट आणि वर्कआउट आहे.