‘हिरोपंती’पासून बॉलिवूड करिअर सुरू करणारी क्रिती सॅनन बघता बघता मोठी स्टार बनली. क्रितीच्या इन्स्टाग्रामवरील फालोअर्सची संख्या ४० लाखांवर पोहोचली आहे, यावरून तिच्या वाढत्या लोकप्रीयतेची कल्पना येते. ‘हिरोपंती’नंतर क्रिती ‘दिलवाले’मध्ये दिसली. शाहरूख खान आणि काजोलसारखे बडे स्टार्स असूनही या चित्रपटात क्रिती भाव खावून गेली. त्याचा परिणाम म्हणजे, तिच्या फालोअर्सची संख्या ४० लाखांवर पोहोचली आहे. ही मोठी उपलब्धी मानत, क्रितीने यासाठी सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. लवकरच क्रिती ‘राबता’ व ‘बरेली की बर्फी’ या दोन चित्रपटात दिसणार आहे. ‘राबता’मध्ये सुशांत सिंह राजपूत तिचा हिरो आहे तर ‘बरेली की बर्फी’मध्ये ती आयुष्यमान खुरानासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
क्रितीचे इन्स्टाग्रामवर ४० लाख फालोअर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 20:47 IST