Join us

3850_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 01:43 IST

महिलांनी आपले विश्व विस्तारले आहे. ठरविलेल्या चौकटी मोडून काम करण्यात महिला अग्रेसर आहेत. घरकाम करणारी महिला, काळजी घेणारी आई, सुंदर पत्नी आणि उत्कृष्ट बॉस अशी सर्व भूमिका त्या पार पाडतात. ज्यांनी उद्योगामध्ये आपले नाव कमाविले, त्याचप्रमाणे ज्या आकर्षकही आहेत, अशा भारतामधील उद्योजिकांविषयी माहिती देत आहोत.

महिलांनी आपले विश्व विस्तारले आहे. ठरविलेल्या चौकटी मोडून काम करण्यात महिला अग्रेसर आहेत. घरकाम करणारी महिला, काळजी घेणारी आई, सुंदर पत्नी आणि उत्कृष्ट बॉस अशी सर्व भूमिका त्या पार पाडतात. ज्यांनी उद्योगामध्ये आपले नाव कमाविले, त्याचप्रमाणे ज्या आकर्षकही आहेत, अशा भारतामधील उद्योजिकांविषयी माहिती देत आहोत.‘इंडियन सिटी प्रॉपर्टी लिमिटेड’ (आयसीपीटी)च्या सहकार्यकारी संचालिका. त्यांनी बोस्टन येथील वेलस्ली महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळविली आहे. गणितासोबतच त्यांनी रंगकामातही पदवी मिळविली आहे. दिल्लीमध्ये राहताना त्या ‘निमया’ या अशासकीय संस्था चालवितात. इंटीग्रेटेड रिअ‍ॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि द वॉटर बेस लिमिटेड या संस्थेवर काम करीत आहेत. स्वत:च्या नावाने त्यांचे दागिन्यांचे शोरुमही आहे.कल्याणी सहा चावला या डिओरच्या उपाध्यक्षा आहेत. ख्रिस्टीयन डिओर कोचर याच्या त्या सर्वेसर्वा आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट ब्रँडमध्ये डिओरचा समावेश आहे. त्या खºया अर्थाने प्रत्येक बाबतीत फॅशन दिवा आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.डेक्कन क्रोनिक्रल्सचे मालक टी. व्यंकटराम रेड्डी यांच्या त्या कन्या आहेत. त्यांना संगीत, पर्यटन आणि खेळामध्ये रुची आहे. त्याशिवाय डिझाईन आणि पदार्थांकडेही त्यांचा ओढा आहे. आयपीएलमधील डेक्कन चार्जर्सच्या त्या मालकीण आहेत.गरवारे या आडनावातच सारे काही सांगून जाते. गरवारे पॉलिएस्टर्सच्या त्या सहकार्यकारी संचालिका आहेत. गरवारे ही नावाजलेली कंपनी आहे. सामाजिक क्षेत्रात सोनिया गरवारे हे नाव सर्वांना परिचित आहे. आपल्या कपड्यांवियषी त्या नेहमी सतर्क असतात.इटालियन पत्नी आणि जुळ्यांची माता असणाºया रमोना नारंग रोडेला या पोशाखातील गाजलेल्या ‘बेला’ या ब्रँडच्या मालकीण आहेत. आपल्या मुलीचेच नाव या ब्रँडला दिलेले आहे. बॉलीवूडमधील अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी अनेक क्षेत्रात आपले नाव कमाविलेले आहे.