Join us

​ ‘3 स्टोरीज’ हे नवे पोस्टर आहे खास, समजण्यासाठी घ्यावे लागतील थोडे कष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 15:50 IST

येत्या ९ मार्चला एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘3 स्टोरीज’. अर्जुन मुखर्जी दिग्दर्शित  ...

येत्या ९ मार्चला एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘3 स्टोरीज’. अर्जुन मुखर्जी दिग्दर्शित  ‘3 स्टोरीज’चे नवे पोस्टर आज रिलीज झाले.  बॉलिवूडचा ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शने ‘Check out the eye-catching posters of  #3Storeys’ या कॅप्शनसह हे पोस्टर शेअर केले आहे. तरण म्हणतो त्याप्रमाणे निश्चितपणे ‘3 स्टोरीज’चे पोस्टर लक्षवेधी आहे. ३ डी इफेक्ट्ससह हे पोस्टर तयार करण्यात आहे. अर्थात ते समजण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. होय, फोटोत लपलेला चेहरा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच आणि यासाठी फोटो उलटा करून बघितलाच तर त्यात पुलकीत सम्राट, रेणुका शहाणे व शरमन जोशीचे चेहरे तुम्हाला आळीपाळीने दिसतील.   ALSO READ : थ्रील, सस्पेन्स, लव्ह, रोमान्सचे कॉकटेल आहे ‘३ स्टोरीज्’ चा ट्रेलर!अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. थ्रील, सस्पेन्स, लव्ह, रोमान्स अशा सगळ्यांचे मिश्रण असलेल्या ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. अर्थात एक गोष्ट मात्र यात समान आहे, ती म्हणजे, चित्रपटातील प्रत्येक पात्राचा  एक भूतकाळ आहे. येत्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटात  शरमन जोशी, पुलकित सम्राट, रिचा चड्ढा. मासुमेह आणि रेणुका शहाणे मुख्य भूमिकेत आहे. प्रतिभा, आयशा अहमद आणि अंकित राठी काही नवे चेहरेही यात दिसताहेत. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात सलमानच्या वहीणीची भूमिका साकारणारी रेणुका शहाणे या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर वापसी करतेय. यात ती गोव्याच्या एका वयोवृद्ध महिलेच्या भूमिकेत आहेत. अर्जुन मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट फरहान अख्तर, रितेश सिंधवानी यांची निर्मिती आहे.