Join us

धर्मेन्द्र यांच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना, स्टाफमधील तीन कर्मचारी पॉझिटीव्ह!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 17:37 IST

धर्मेन्द्र लोणावळ्यातील आपल्या फार्महाऊसवर मुक्कामाला असतात. पण आज ते मुंबईत आहेत.

ठळक मुद्देबॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आजच आमिर खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.

देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बॉलिवूडमध्येही चिंतेचे वातावरण आहे. इंडस्ट्रीच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाने ग्रासले आहे. आता बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला आहे. त्यांच्या स्टाफच्या तीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. वृत्तात म्हटल्यानुसार, धर्मेन्द्र यांच्या जुहू बंगल्यावरील स्टाफमधील तीन कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याने देओल कुटुंब अधिक सतर्क झाले आहे. सर्व नियम पाळले जात आहे. धर्मेन्द्र यांचीही काळजी घेतली जात आहे. कोरोनाग्रस्त कर्मचा-यांना त्वरित आयसोलेट करण्यात आले आहे. तसे धर्मेन्द्र लोणावळ्यातील आपल्या फार्महाऊसवर मुक्कामाला असतात. पण आज ते मुंबईत आहेत.

धर्मेन्द्र यांनी दिला दुजोराधर्मेन्द्र यांनी स्टाफच्या लोकांना कोरोना झाल्याचे वृत्त कन्फर्म केले आहे. मी लस घेतली आहे. पण कर्मचाºयांना लागण झाल्यानंतर मी सुद्धा कोरोना टेस्ट केली आहे. अद्याप टेस्ट रिपोर्ट यायचा आहे, असे त्यांनी सांगितले. गत 19 मार्चला धर्मेन्द्र यांनी कोरोना लस घेतल्याचा फोटो शेअर केला होता. ‘ट्विट करते करते जोश आ गया और मैं निकल गया व्हॅक्सिन लेने....,’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

बॉलिवूडमध्ये वाढतेय संक्रमणबॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आजच आमिर खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्याआधी कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी, तारा सुतारिया आदींना कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :धमेंद्रकोरोना वायरस बातम्या