Join us

25 वर्षांनंतर धकधक गर्लनं मुन्नाभाईला का केला फोन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 13:52 IST

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि मुन्नाभाई संजय दत्त यांच्या लव्हस्टोरीचा द एंड कधीच झालाय. माधुरी डॉ. नेनेंसह आपल्या संसारात ...

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि मुन्नाभाई संजय दत्त यांच्या लव्हस्टोरीचा द एंड कधीच झालाय. माधुरी डॉ. नेनेंसह आपल्या संसारात सुखी आहे. तर मुन्नाभाई आणि मान्यताचं आयुष्य आनंदात सुरु आहे. मात्र संजूबाबासह आपल्या अधु-या प्रेमकहानीमुळं धकधक गर्ल सध्या बैचेन झालीय. तिच्या या बैचेनीचं कारण आहे संजय दत्तच्या जीवनावर बनणारा सिनेमा. या सिनेमात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. सिनेमात संजय दत्त आणि माधुरीची लव्हस्टोरी असणार का याकडं नजरा लागल्यात. मात्र यावरुनच माधुरीची धकधक वाढवलीय. त्यामुळंच तब्बल 25 वर्षांनंतर माधुरीनं संजूबाबाला फोन केला आणि सिनेमात ही लव्हस्टोरी नसावी अशी विनंती केल्याचं समजतंय. मात्र संजय दत्तनं याआधीच राजकुमार हिरानी यांना या लव्हस्टोरीचा सिनेमात समावेश असू नये सांगितलंय. त्यातच आता धकधक गर्लनं स्वतः विनंती केली म्हटल्यावर रुपेरी पडद्यावर संजूबाबा-धकधक गर्लची अधुरी प्रेमकहानी दिसणार नसल्याचं बोललं जातंय.