Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद सोमणच्या याच वादग्रस्त फोटोने झाला होता प्रचंड गदारोळ, आजही चाहत्यांच्या लक्षात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 14:47 IST

२५ वर्षांपूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया किंबहुना मीडियाचा इतका गाजावाजा नव्हता त्या काळातही मिलिंद सोमनच्या या फोटोने धुमाकुळ घातला होता.

संपूर्ण विवस्त्रावस्थेत एकमेकांना बिलगलेल्या जोडप्याच्या पायात शूज आहेत व दोघांनाही अजगरानं विळखा घातला आहे, असे फोटोशूट एका जाहिरातीसाठी मिलिंदने मॉडेल मधू सप्रेसह केली होती. जेव्हा ही जाहीरात प्रदर्शित झाली तेव्हा असा फोटो पाहून तुफान खळबळ माजली होती. अनेकांनी या फोटोवर संतप्त प्रतिक्रीया दिली होती. मिलिंद आणि मधू दोघांनाही प्रचंड वादाला सामोरे लावले लागले होते. या फोटोशूटला २५ वर्ष झाली असली तरीही आजही चाहत्यांच्या या फोटोशूटचा कारनामा चांगलाच लक्षात आहे.

मिलिंद सोमन नाव घेतले तरीही अनेकांनी आधी ती अजगर गुंडाळेला फोटो नाही आठवला तरच नवल.  २५ वर्षांपूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया किंबहुना मीडियाचा इतका गाजावाजा नव्हता त्या काळातही मिलिंद सोमनच्या या फोटोने धुमाकुळ घातला होता. त्या काळात कोणतेही मॉडेल असे फोटोशूट करायला तयरा नसायचे. २५ पूर्वीचा काळ वेगळा होता. त्यावेळी मिलिंदनं हे धाडस केलं होतं. या फोटोशूटमुळं झालेल्या प्रखर टीकेमुळं मॉडेल मधु सप्रे हिला प्रचंड डिप्रेशन आलं होतं. पण त्याचवेळी तिला आणि मिलिंदला ग्लॅमरही मिळालं होतं. प्रॉडक्ट गाजल्यानं जाहिरात-दारांचेही काम साधलं गेलं होतं.

सुपर मॉडेल मधु सप्रे सध्या कुठे आहे, काय करते?

मॉडेल म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणा-या मधुने 1992 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. पण मिस युनिव्हर्स स्पर्धेत एका उत्तराने तिला आपला मुकुट गमावावा लागला होता. तु देशाची पंतप्रधान बनलीस तर काय करशील? असा प्रश्न या स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये तिला विचारण्यात आला होता. यावर मला भारतात एक मोठे स्टेडियम बनवायला आवडेल असे उत्तर तिने दिले होते. भारतात खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदाने नाहीत, असे ती म्हणाली होती.

या असामान्य उत्तरामुळेच मधुने मुकुट गमावला अशी चर्चा त्यावेळी झाली होती. अर्थात, मनापासून जे वाटले तेच उत्तर दिल्याने आपणास खंत नाही, मधुने इटलीतील आयस्क्रिम बिझनेसमॅन जिआर मारियासह लग्न केले आणि आपल्या कुटुंबीयांसह इटलीत स्थायिक झाली.असेही तिने म्हटले होते.

टॅग्स :मिलिंद सोमण