Join us
Daily Top 2Weekly Top 5

​परिणीतिची २५ तास सलग शूटींग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 17:44 IST

तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, पण परिणीति चोपडा सध्या रात्रंदिवस काम करतेयं. ‘मेरी प्यारी बिंदु’मध्ये परी सध्या बिझी आहे. अलीकडे ...

तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, पण परिणीति चोपडा सध्या रात्रंदिवस काम करतेयं. ‘मेरी प्यारी बिंदु’मध्ये परी सध्या बिझी आहे. अलीकडे या चित्रपटासाठी परिणीतिने सलग २५ तास शूटींग केले. मग काय?? २५ तास शूटींग म्हटल्यावर..हालत खराब होणारच..परिणीतिने आपला एक फोटो पोस्ट आहे. यात ती कमालीची थकलेली दिसते आहे. शरिरातला सगळा त्राण निघून गेलेली परी सोफ्यावर पहुडलेली आहे आणि मेकअप आर्टिस्ट तिला तयार करीत आहे, असा हा फोटो आहे.कोलकात्यात  ‘मेरी प्यारी बिंदु’ची शूटींग सुरु आहे. शूटींगचाही एक फोटो तिने शेअर केलाय. यात परी हाताने ओढल्या जाणाºया रिक्षात उभी आहे आणि आयुष्यमान खुराणा तिला ओढतोय, असे दिसतेयं..असो, पण परी इतके कामही बरे नाही...आम्ही तुला हे सांगायला नको..‘नाईट शूट सुरु आहे. २५ तास जागी आहे. बिंदू आता जाम थकलीयं ’ असे परीने लिहिले आहे.