२०१६ : या लिजेंड गायकांसाठी ठरले धोक्याचं वरीस...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 17:59 IST
एकेकाळी आपल्या गायकीने देशाला वेड लावणारे बॉलिवूडमधील लिजेंड समजले जाणारे गायक सध्या बेरोजगार झाले आहेत. शेकडो सुपरहिट गाणी आणि ...
२०१६ : या लिजेंड गायकांसाठी ठरले धोक्याचं वरीस...!
एकेकाळी आपल्या गायकीने देशाला वेड लावणारे बॉलिवूडमधील लिजेंड समजले जाणारे गायक सध्या बेरोजगार झाले आहेत. शेकडो सुपरहिट गाणी आणि कित्येक अवॉर्ड्सवर नाव कोरणाºया या गायकांसाठी २०१६ हे वर्ष खरोखरच ‘धोक्याचे’ ठरले आहे. दरवर्षी इंडस्ट्रीमध्ये किमान एक प्लेबॅक सिंगर एंट्री करीत असल्याने प्रेक्षकांना एका नवा आवाज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे लिजेंड सिंगर्सचा आवाज दबला आहे. अशाच काही गायकांच्या २०१६ मधील कामगिरींवरचा हा दृष्टांत... अलका याज्ञिक दोन राष्ट्रीय आणि सात फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या गायिका अलका याज्ञिक यांनी आतापर्यंत शेकडो गाणी गायिली आहेत; मात्र २०१६ हे वर्ष त्यांच्यासाठी खºया अर्थाने धोक्याचे ठरले आहे. त्यांना या वर्षात केवळ तीनच चित्रपटांमध्ये गाणी गायला मिळालीत; मात्र हे तिन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसे यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे त्यांचा आवाजही या चित्रपटांच्या अयशस्वीतेमध्ये दबला गेला. खरं तर अलका याज्ञिक हे इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे; मात्र २०१६ या वर्षात त्यांचा आवाज दबला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उदित नारायण६१ वर्षीय प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचे बॉलिवूडमधील योगदान त्यांना लिजेंड हा दर्जा मिळवून देणारे आहे. १९८० मध्ये आपल्या करिअरला सुरुवात करणाºया उदित नारायण यांनी सुरुवातीलाच मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘उन्नीस-बीस’ या चित्रपटात गाणे गायिले. ‘फूल और कांटे, दिल, आशिकी, जो जीता वही सिकंदर’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी प्लेबॅक सिंगर्स म्हणून काम केले; मात्र २०१६ या वर्षात त्यांना ‘जय गंगाजल आणि अना’ या दोनच चित्रपटांसाठी गाणे रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. सोनू निगम४३ वर्षीय सोनू निगम हादेखील सध्या बेरोजगार आहे. कारण २०१६ मध्ये त्याने ‘६ पॅक बॅण्ड’ या अल्बमसाठी ‘सब रब दे बंदे आणि फर्स्ट डे’ हे गाणी रेकॉर्ड केले. त्यामुळे त्याला या वर्षात बॉलिवूडऐवजी साउथ इंडियन चित्रपटांमध्ये अॅक्टिव्ह राहावे लागले. एकेकाळी सोनूने ‘दिवाना... जान... याद... ये नया नया...’ यासारखे सुपरहिट गाणे गायले आहेत. त्याचबरोबर काही सुपरहिट अल्बमदेखील सादर केले आहेत; मात्र २०१६ हे वर्ष त्याच्यासाठी खूपच धोक्याचं वरीस ठरले आहे. अलीशा चिनॉय१९९० मध्ये अलीशा चिनॉय हिने अन्नु मलिक यांच्यासोबत सुपरहिट गाणी गायिली आहेत. २००५ मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’ या गाण्याने तर तिला रातोरात स्टार केले. त्याव्यतिरिक्त ‘मेड इन इंडिया, अलीशा, जादू’ यासारख्या सुपरहिट अल्बममध्येही तिच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना भावली. तिने शेवटचे गाणे २०१३ मध्ये आलेल्या ‘क्रिश-३’ या चित्रपटासाठी रेकॉर्ड केले होते. २०१६ मध्ये तर तिला एकही गाणे गाता आले नाही. उषा उत्थुप६९ वर्षीय उषा उत्थुप यांनी बºयाचशा पॉप, जज आणि पार्ट्यांसाठी गाणी गायिली आहेत. आपल्या विशिष्ट आवाजामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणाºया उषा उत्थुप यांना मात्र २०१६ हे साल फारच अडखळीचे गेले. एक दो चा चा चा (शालिमार), डार्लिंग (सात खून माफ) यासारखे सुपरहिट गाणे गाणाºया उषा यांना २०१६ मध्ये केवळ एकच गाणे रेकॉर्ड करता आले. रॉक आॅन-२ मध्ये तिचा आवाज प्रेक्षकांना ऐकावयास मिळाला. कुमार सानू५९ वर्षीय बॉलिवूड लीडिंग प्लेबॅक सिंगर कुमार सानू यांच्याकरिता सुद्धा २०१६ हे वर्ष खूपच अडचणीचे गेले आहे. आजही कुमार सानू यांची गाणी प्रेक्षकांच्या मनाला भावतात; मात्र नव्या गायकांच्या आवाजासमोर त्यांचा आवाज दबला गेला आहे. दिल का आलम (आशिकी), दिल का रिश्ता ( दिल का रिश्ता), राजा को रानी से (अकेले हम अकेले तुम), परदेसी परदेसी (राजा हिंदुस्तानी) अशी कित्येक सुपरहिट गाणी गाणारे कुमार सानू आज बेरोजगार आहेत. १९९० ते २००० हा त्यांचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. कविता कृष्णमूर्ती क्लासिकल म्युझिकची ट्रेनिंग घेतलेल्या कविता कृष्णमूर्ती यांनी ‘डोला रे डोला (देवदास), आज मैं उपर (खामोशी : द म्युझिकल), मेरा पिया घर आया (याराना), प्यार हुआ चुपके से (१९४२ : ए लव्ह स्टोरी) यासारखे सुपरहिट गाणे गायिलेले आहेत. पॉप सॉँग्सबरोबरच कविता यांनी भजनही गायिलेले आहे; मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा इंडस्ट्रीमधील वावर कमी झाला आहे. २०१५ मध्ये त्यांनी दोन गाणी रेकॉर्ड केली. तर २०१६ मध्ये केवळ ‘ब्लॅक टिकट’ हे एकमेव गाणे रेकॉर्ड केले. पलाश सेन‘युफोरिया’ या पॉप बॅण्डचा फाउंडर पलाश सेन गायकाबरोबरच गीतकार आणि संगीतकारही आहे. ‘धूम पिचक धूम... मायरी... फिर आना तू मेरी गली’ यासारखे सुपरहिट गीत त्याच्या नावावर आहेत; मात्र गेल्या काही वर्षांपासून तो बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी स्ट्रगल करीत आहे. २०१६ मध्ये त्यांने एकही गाणे रेकॉर्ड केले नाही.