Join us

घटस्फोटाच्या 2 वर्षांनंतर सुजैन खानने सांगितले होते हृतिक रोशनसोबत वेगळे होण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:14 IST

हृतिक रोशन आणि सुजैन खान 2014 साली विभक्त झाले. मात्र आजही ते दोघे एकमेकांचे चांगले फ्रेण्ड्स आहेत.

बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणजेच अभिनेता हृतिक रोशनसुजैन खान हे विभक्त झाले असले तरी ते दोघेही त्यांच्या मुलांसाठी नेहमीच एकत्र येत असतात. इतकंच नाही तर ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. हृतिक व सुजैनने 2000 साली लग्नबेडीत अडकले होते. लग्नाच्या 13 वर्षानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांचा निर्णय ऐकून त्यांच्या चाहत्यांना खूप धक्का बसला होता. सुजैनने घटस्फोटाच्या दोन वर्षानंतर यामागचं कारण सांगितलं होतं.

सुजैनने फेमिनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही जीवनाच्या या स्टेजवर येऊन पोहचले होतो जिथे एकत्र राहण्याऐवजी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. चुकीच्या नात्यात राहण्याऐवजी याबद्दल माहित होणे गरजेचे होते.

सुजैनने पुढे सांगितले की, आमचे लग्न तुटले पण माझे व हृतिकमध्ये चांगले बॉण्डिंग आहे. आम्ही मुलांसाठी नेहमीच कमिटेड राहणार आहे. आम्ही चांगले फ्रेण्ड आहोत. आम्ही खूप बोलायचो पण आता एकत्र वेळ व्यतित करत नाही. पण, आमच्या मुलांसाठी आम्ही कमिटिड आहेत. आम्ही एकमेकांचा आदर ठेवतो. जेव्हा आम्ही मुलांसोबत असतो. त्यावेळी आम्ही आमच्या नात्यातील कटूता विसरून एक होतो.

लॉकडाउनदरम्यान हृतिक रोशन आपल्या घरात मुलं व सुजैनसोबत राहत आहे.

मुलांसोबत वेळ व्यतित करण्यासाठी सुजैन काही दिवसांसाठी हृतिकच्या घरी राहण्यासाठी आली आहे. हृतिकने सुजैनचे आभार मानत एक पोस्टही शेअर केला होता.

टॅग्स :सुजैन खानहृतिक रोशन