Join us
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटी जमा केल्यावर रंगून झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 20:11 IST

दिग्दर्शक विशाल भारद्वाज दिग्दर्शित रंगून या चित्रपटातील अभिनेत्री कंगना राणौतने साकारलेली ‘हंटरवाली’ ही भूमिका ‘फिअरलेस नाडिया’ या चरित्राची कॉपी ...

दिग्दर्शक विशाल भारद्वाज दिग्दर्शित रंगून या चित्रपटातील अभिनेत्री कंगना राणौतने साकारलेली ‘हंटरवाली’ ही भूमिका ‘फिअरलेस नाडिया’ या चरित्राची कॉपी असल्याचा आरोप वाडिया मुव्हिटोनने केला होता. कॉपीराईट अ‍ॅक्टचे उल्लंघन केल्याप्रक रणी वाडिया मुव्हिटोनने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी सुरू केली असून या चित्रपटाच्या रिलीजसाठी निर्मात्यांना २ कोटी रुपये अमानत रक्कम म्हणून जमा करण्याचा आदेश दिला. या आदेशाचे पालन के ल्यावरच रंगून रिलीज झाला आहे असे सांगण्यात येत आहे. ‘रंगून’ या चित्रपटात कंगना राणौत, सैफ अली खान व शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात कंगना राणौत साकारत असलेली भूमिका मिस जुलिया हिचा अंदाज ४० च्या दशकातील अभिनेत्री नादिया हिच्यासारखा असल्याने हा वाद निर्माण झाला होता. वाडिया यांनी केलेल्या दाव्यानुसार मिस जुलियासाठी वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टी या फिअरलेस नादियाशी संबधित आहेत. ‘ब्लडी हेल’ हे वाक्य देखील वापरणे हे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन आहे. रंगून मध्ये ब्लडी हेल हे गीत गात कंगना सैनिकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. मुंबई हाय कोर्टाने हा खटला दाखल करून घेतला असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वाडिया मुव्हीटोन प्रा. लि. या प्रॉडक्शन हाऊसने केलेल्या तक्रारीची चौकशी होणार असून दोन चित्रपटातील व्यक्तीरेखांमध्ये साम्य आढळले अथवा कॉपी केल्याचे सिध्द झाले तर ‘रंगून’च्या निर्मात्याला मोठा दंड होऊ शकतो. दरम्यान वाडिया मुव्हीटोन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख रॉय वाडिया यांनी या प्रकाराला विश्वासघात म्हंटले होते. रॉनी स्क्रू वाला व विशाल भारद्वाज यांनी यूटीव्हीसाठी नादियासारखेच पात्र ठेऊन चित्रपट तयार केला असल्याचे सांगितले होते. दरम्यान रंगूनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ट्रेन्ड येत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी प्रेमकथा असे या चित्रपटाचे विश्लेशन करण्यात आले आहे.