Join us

प्रेम, धोका अन् बदला! २ तास ७ मिनिटांचा थराथर सिनेमा; ट्विस्ट पाहून चक्रावून जाल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:33 IST

२ तास ७ मिनिटांचा थराथर सिनेमा; ट्विस्ट पाहून डोकं होईल सुन्न, तुम्ही पाहिलात का?

Bollywod Cinema: हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर अनेक सुरेख चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण, त्यातील काही मोजक्याच चित्रपटांची चर्चा होताना दिसते. एकेकाळी रोमान्स, अॅक्शन फिल्म्सना गर्दी करणारे प्रेक्षक आता थ्रिलर, सस्पेन्स, हॉरर कन्टेंटवर आधारित सिनेमांकडे वळले आहेत. अशाच एका चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

दरम्यान, हल्ली प्रेक्षकांमध्ये थ्रिलर, रहस्यमय आणि क्राइम जॉनरच्या सिनेमांची नेहमीच चर्चा सुरु असते. या सिनेमांना प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. असाच एक सिनेमा ज्याचे आतापर्यंत चार भाग आले आणि प्रत्येक भागाला रसिकांनी डोक्यावर उचलून धरलं.यामध्ये प्रेम आणि बदल्याची आग असा ट्विस्ट दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचं नाव 'हेट स्टोरी-3' आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र तुमच्या हृदयाला भिडेल. शिवाय क्लायमॅक्स पाहून डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही.

हेट स्टोरी ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय एरोटिक फिल्म फ्रेंचाईजी आहे. करण सिंग ग्रोव्हर, शर्मन जोशी, जरीन खान आणि डेझी शाह स्टार हा चित्रपट १० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याच्या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. विशाल पंड्या दिग्दर्शित हा चित्रपट अंदाजे २० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. IMDb वर या चित्रपटाला ४.६ रेटिंग मिळालं आहे.

चित्रपटाची कथा दोन व्यावसायिक आणि एका अतिशय सुंदर मुलीभोवती फिरते, ज्यामुळे दोन्ही मुलांमध्ये तिच्या प्रेमासाठी एक करार होतो. आदित्य दिवाण (शरमन जोशी) त्याच्या भावाच्या मृत्यूनंतर व्यवसायाची जबाबदारी घेतो, पण जेव्हा सौरव सिंघानिया (करण सिंग ग्रोव्हर) त्याला एक  कराराबद्दल सांगतो आणि त्यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट येतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Love, Betrayal, and Revenge! Thrilling Movie with Shocking Twists.

Web Summary : Bollywood's 'Hate Story 3,' a thriller about love, betrayal, and revenge, captivated audiences with its twists. Starring Karan Singh Grover, Sharman Joshi, and others, the film, made on a budget of 20 crores, earned over 60 crores at the box office.
टॅग्स :बॉलिवूडशरमन जोशीजरीन खानसिनेमा