Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फोटो घे, पण असा हॉर्न वाजवू नको...'कारचा पाठलाग करणाऱ्या चाहत्यांवर भडकला अरिजित सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 17:03 IST

अरिजितसोबत फोटो,सेल्फी, व्हिडिओ काढणं तर नेहमीच सुरु असतं, पण यावेळी चाहत्यांनी तर हद्दच केली. 

आपल्या सुंदर आवजाने सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या आवजाची जादू पाहायला मिळाली. अरिजीतची गणना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी गायकांमध्ये केली जाते. अरिजित सिंह कुठेही दिसला की,चाहते त्याला घेरतात. अरिजितसोबत फोटो,सेल्फी, व्हिडिओ काढणं तर नेहमीच सुरु असतं, पण यावेळी चाहत्यांनी तर हद्दच केली. 

अरिजितचा एक व्हिडोओ समोर आला आहे. ज्यामध्ये चाहते रिजितच्या गाडीचा पाठलाग करताना दिसत आहेत. शिवाय ते हार्न वाजवतात आणि त्याच्या कारची काचही ठोठावतात. यावर अरिजित सिंह थोडासा चिडलेला दिसला. गाडीच आरसा खाली करून तो चाहत्यांना म्हणाला, 'मला भेटायचे आहे म्हणून तुम्ही इतरांना त्रास देत आहात. तुम्ही एवढं फोटोसाठी केलं. तर फोटो घ्या. पण पुन्हा असं काही करु नका'. 

यापुर्वी अरिजीत सिंहचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. शॉपिंग केल्यावर हातात पिशवी घेऊन आपल्या गाडीकडे जातानाचा हा व्हिडिओ होता. बाईक सुरु करतानाच तो शेजाऱ्यांशी बंगाली भाषेत गप्पाही मारताना दिसतोय. कॅज्युअल टीशर्ट, पँट घालून तो बाहेर पडला.  इतक्या प्रसिद्ध गायकाचा हा साधा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं. 

अरिजीत सिंह पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा आहे. आई बंगाली होती तर वडील शीख आहेत. कोरोना आला तेव्हा लॉकडाऊनवेळी तो पुन्हा आपल्या गावी जाऊन राहिला होताय. तो केवळ तिकडे शिफ्ट झाला नाही तर त्याने पगडी घालायलाही सुरुवात केली.  

टॅग्स :अरिजीत सिंहबॉलिवूडसिनेमा