Join us

"मी सासूची भूमिका...; 'गदर-२' सिनेमात काम करताना अमिषा पटेलने दिग्दर्शकासमोर ठेवली होती अशी अट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 09:11 IST

अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) यांची जोडी 'गदर' चित्रपटामुळे लोकप्रिय झाली. '

Amisha Patel Gadar-2 : अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) यांची जोडी 'गदर' चित्रपटामुळे लोकप्रिय झाली. 'गदर : एक प्रेमकथा' च्या माध्यमातून तारा-सकिनाच्या जोडीने सिनेरसिकांच्या मनावर गारुड घातलं. साल २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाचा सीक्वेल तब्बल २३ वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत रेकॉर्डब्रेक कमाई केली. त्याचबरोबर दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं असून यामध्ये अमीषा पटेल आणि सनी देओल यांनी तारा-सकिनाच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत. परंतु ‘गदर-२’ या चित्रपटावेळी अमिषा पटेल आणि दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यामध्ये असाख काहीतरी बिनसलं होतं. याचा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. 

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नुकत्याच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले. त्यादरम्यान अमिषा पटेल  'गदर-२'मध्ये सासूची भूमिका साकारण्यास तयार नव्हती असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी या मुलाखतीमध्ये अनिल शर्मा म्हणाले," गदर-२' चित्रपटामध्ये अमिषा पटेलचे सीन मोजकेच होते. 'गदर' पेक्षा 'गदर-२' च्या स्टोरीमध्ये तिच्या पात्राला फार कमी जागा मिळाली. त्यामुळे वय आणि वेळेचं गणित तिला समजलं नाही. जर तू जीतेच्या आईची भूमिका साकारतेय तर तुला सूनेसाठी सासू म्हणून देखील काम करावं लागेल."

पुढे ते म्हणाले, "आम्हाला मान्य आहे तुम्ही प्रचंड मेहनत केली आहे. पण एक कलाकार म्हणून तु्म्हाला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. अभिनेत्री निर्गिस यांनी सुद्धा 'मदर इंडिया' चित्रपटात तरूण असूनही आईची भूमिका साकारली होती. अमिषा पटेल कधी-कधी बोलायची की मी सासूची भूमिका करणार नाही. मला त्यासाठी जास्त पैसे दिले तरीही मी ते करणार नाही. मला समजलंच नाही तिच्या डोक्यात असे विचार कसे आले." असा खुलासा त्यांनी केला.

टॅग्स :अमिषा पटेलसनी देओलबॉलिवूडसेलिब्रिटी